Amit Mishra vs Afridi : यासिन मलिकची पाठराखण करणा-या आफ्रिदीला अमित मिश्राची चपराक!

Amit Mishra vs Afridi : यासिन मलिकची पाठराखण करणा-या आफ्रिदीला अमित मिश्राची चपराक!
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : जम्मू कश्मीरमधील फुटिरतावादी नेता यासीन मलिक याला टेरर फंडिंग प्रकरणी दिल्लीतील पटियाला कोर्टाने दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली. तसेच त्याला १० लाखाचा दंडही ठोठावण्यात आला आहे. दरम्यान, यासीनची पाठराखण करत पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहीद अफ्रिदीने भारताविरुद्ध गरळ ओकली आहे. त्याने वादग्रस्त ट्विट करत यासिन मलिकला निर्दोष ठरवण्याचा प्रयत्न केला आहे. (Amit Mishra vs Afridi)

आफ्रिदीने ट्विटमध्ये म्हटले आहे की, मानव अधिकारासाठी लढणाऱ्यांना भारत शांत करण्याचे प्रयत्न करत आहे. हे सर्व निरर्थक आहे. यासीन मलिक विरोधात खोटे आरोप करून भारत काश्मीरच्या स्वातंत्र्याचा संघर्ष रोखू शकत नाही. कश्मीरमधील नेत्यांविरोधात सुरू असलेल्या या बेकायदेशीर कारवाई विरोधात संयुक्त राष्ट्राने हस्तक्षेप करावे', अशी मागणी केली आहे. (Amit Mishra vs Afridi)

या ट्विट नंतर शाहीद आफ्रीदी ट्रोल होत असून अनेकांनी त्याला प्रत्युत्तर दिले आहे. यातच भारताचा माजी क्रिकेटपटू अमित मिश्राने शाहीद आफ्रिदीवर जोरदार हल्लाबोल करत पलटवार केला आहे. 'प्रिय शाहीद आफ्रिदी, यासीन मलिकने स्वत: न्यायालयात गुन्हा कबूल केला आहे. तुझ्या जन्मतारखेसारखंच सर्वच काही फसवं नसतं', असा जबरदस्त टोमणा मिश्राने लगावला आहे. (Amit Mishra vs Afridi)

'मला आपल्यावर लावण्यात आलेल्या आरोपांना सामोरे जायचे नाही'', असे मलिक याने न्यायालयाला यापूर्वी सांगितले होते. मलिक सध्या दिल्लीच्या तिहार तुरुंगात आहे. २०१७ च्या हिंसाचाराशी संबंधित प्रकरणात कलम १२०-ब गुन्हेगारी कट, कलम १२४-अ देशद्रोहचे आरोप मलिकवर लावण्यात आले.

दहशतवादी बुरहानी चकमकीत ठार झाल्यानंतर २०१६-२०१७ मध्ये काश्मीर खोऱ्यात दहशतवादी घटनांमध्ये वाढ झाली. यानंतर तपास यंत्रणा एनआयएने यासीन मलिक आणि अन्य फुटीरतावाद्यांविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली असून, कोर्टात झालेल्या सुनावणीदरम्यान मलिकने सर्व आरोपांची कबुली दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news