लातूर : जुळ्या दिराचा वहिनीवर बलात्कार; नवऱ्यासारखा दिसत असल्याचा घेतला गैरफायदा | पुढारी

लातूर : जुळ्या दिराचा वहिनीवर बलात्कार; नवऱ्यासारखा दिसत असल्याचा घेतला गैरफायदा

लातूर, पुढारी वृतसेवा : लातूर शहरात रींग रोड येथे जुळे असल्याचा फायदा घेत आपल्याच भावजयीवर भावाच्या संमतीने तब्बल सहा महीने अत्याचार केले. हा प्रकार पीडितेच्या लक्षात येताच याबाबत शिवाजी नगर पोलिस ठाण्यात तक्रार तक्रार दाखल केली.

पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, लातूर शहरात रींग रोड भागात रहाणाऱ्या एक वर्षापूर्वी तरुणीचा (वय २०) विवाह झाला होता. तिच्या पतीस एक जुळा भाऊ आहे. या दोघा भावंड सारखेच असल्‍यामूळे त्यांची ओळख सहज पटत नाही. या विवाहीतेलाही तसाच अनुभव आला आला. आपला पती कोण हे तिलाही सहज ओळखता आले नाही. याचा गैरफायदा घेत तिच्या दिराने तिच्यावर सहा महिने अत्याचार केला. ही बाब लक्षात येताच तिने पती व सासू सासऱ्याना सांगितले. परंतु त्‍यांनी तिलाच दरडावले. तसेच तुला नांदायचे असेल तर जे सुरू आहे ते राहू दे अशी धमकी दिली. आणि दिरास पाठीशी घातले.

हा त्रास असह्य झाल्याने पीडिता माहेरी गेली व ती सासरी आलीच नाही. दरम्यान तिचा दिर नेण्यासाठी तिच्या माहेरी आला, परंतु सासरी जाण्यास तिने स्पष्ट नकार दिला. माहेरच्यांनी याचे कारण विचारले असता सर्व प्रकार तिने सांगितला. त्‍यानंतर तिने शिवाजी नगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी आरोपींना अटक केली असून सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहेत.

हेही वाचा 

Back to top button