ठाणे : उल्हासनगरात सलग दुसऱ्या दिवशी तरुणाची हत्या

ठाणे : उल्हासनगरात सलग दुसऱ्या दिवशी तरुणाची हत्या
Published on
Updated on

उल्हासनगर; प्रतिनिधी : उल्हासनगर शहरात सलग दुसऱ्या दिवशी तरुणाची हत्या झाल्‍याची घटना समोर आली आहे. तरूणाची हत्‍या  झाल्‍याने पुन्हा उल्हासनगर शहर हादरले.

या विषयी अधिक माहिती अशी की, काल (शुक्रवार) सुशांत गायकवाड या तरुणाची तीक्ष्ण हत्याराने हत्या झाली होती. या प्रकरणी विठ्ठलवाडी अंडी हिललाईन पोलिसांनी संयुक्त कारवाई करीत पाच आरोपींना गजाआड केले. त्याला २४ तास उलटत नाहीत, त्या आधीच पुन्हा एक हत्या झाली आहे.

सुभाष टेकटी मधील सोंग्याची वाडी भागात ही हत्या झाली आहे. ज्ञानेश्वर सोनवणे असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. पहाटेच्या सुमारास ही हत्या झाल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे. ज्ञानेश्वर हा कॅम्प २ मधील रमाबाई आंबेडकर नगर परिसरातील तो राहणार असल्याचे समजते. ही हत्या कोणी आणि का केली हे देखील समजू शकले नाही. सध्या विठ्ठलवाडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून तपास सुरू आहे. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात पाठविला आहे.

पहा व्हिडिओ : ही गोष्ट चिमुरड्याच्या माध्यमातून भक्तीची नवी भाषा शिकवते

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news