sony marathi ganeshutsav
मनोरंजन
बाप्पा महागणेशोत्सव स्पेशल भाग रविवारी
मुंबई; पुढारी ऑनलाईन : सोनी मराठी बाप्पा महागणेशोत्सव स्पेशल २०२१ हा सोहळा प्रेक्षकांना पाहता येणार आहे. १९ सप्टेंबर रविवारी रात्री ८ वाजता सोनी मराठी वाहिनीवर महागणेशोत्सव प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
विविध नृत्यं, गाणी, स्किट्स या सगळ्यांचा आस्वाद या कार्यक्रमातून प्रेक्षकांना मिळणार आहे. अवधूत गुप्ते, गश्मीर महाजनी, पूजा सावंत, अमृता खानविलकर, आशिष पाटील, शुभंकर तावडे असे दिग्गज कलाकार असणार आहेत. हास्यजत्रेची पूर्ण टीम देखील सोनी मराठीच्या या उत्सवात प्रेक्षकांचं मनोरंजन करणार आहे.
नक्की पाहा, सोनी मराठी बाप्पा स्पेशल १९ सप्टेंबर, २०२१, रविवार रात्री ८ वाजता, फक्त आपल्या सोनी मराठीवर.

