

नवी दिल्ली, पुढारी ऑनलाईन : पॅन-आधार लिंक करण्यासाठी केंद्र सरकारने सहा महिन्यांची मुदत वाढवून दिली आहे. ३० डिसेंबर, २०२१ रोजी ही मुदत संपणार होती. मात्र, नव्या नियमानुसार ३१ मार्च, २०२२ पर्यंत पॅन- आधार लिंक करता येणार आहे.
जर ३१ मार्च, २०२२ पर्यंत पॅन- आधार लिंक केले नाही तर वापरकर्त्याला दंड केला जाणार आहे.
केंद्र सरकारने पॅन नंबर आधार नंबरशी लिंक ( पॅन-आधार लिंक ) करण्यासाठी कालमर्याादा घालून दिली होती. ही मर्यादा सहा महिन्यांनी वाढविली आहे.
३० सप्टेंबर, २०२१ रोजी ही कालमर्यादा संपणार होती. मात्र, ती वाढवून ३१ मार्च, २०२२ पर्यंत करण्यात आली आहे.
अर्थमंत्रालयाने तशी सूचना जारी केली आहे.
आयकर अधिनियमाअंतर्गत टॅक्स रिटर्न भरण्याची तारीख ३० सप्टेंबर पासून ३१ मार्चपर्यंत वाढविण्यात आली आहे.
सीबीडीटी ने यासंदर्भात एक अधिसूचना १७ सप्टेंबर रोजी जारी केली आहे.
२३ मार्च, २०२१ रोजी लोकसभेत फायनान्स बिल २०२१ च्या आयकर अधिनियम १९६१ मध्ये सेक्शन २३४ (२३ एच) जोडले आहे.
याअंतर्गत नियमानुसार जर निश्चित केलेल्या तारखेच्या आत जर पॅन नंबर आधारशी लिंक केला नाही तर पॅन कार्ड निष्क्रिय केले जाईल. तसेच दंडही केला जाईल.
SMS सेवेचा वापर करून तुम्ही पॅन आणि आधार कार्ड लिंक करू शकता. त्यासाठी 567678 किंवा 56161 मेसेज पाठवून आधार आणि पॅन लिंक करू शकतो.
हेही वाचा: