JEE Main Result 2024 Session 2 | जेईई मेन सेशन २ चा निकाल जाहीर, महाराष्ट्राचा नीलकृष्ण गजरे देशात टॉपर | पुढारी

JEE Main Result 2024 Session 2 | जेईई मेन सेशन २ चा निकाल जाहीर, महाराष्ट्राचा नीलकृष्ण गजरे देशात टॉपर

पुढारी ऑनलाईन डेस्क : नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने आज गुरुवारी (दि. २५ एप्रिल) जेईई (मेन) सेशन २ चा २०२४ चा निकाल जाहीर केला. जेईई मेन सेशन एप्रिल २०२४ मध्ये बसलेले विद्यार्थी jeemain.nta.nic.in. या अधिकृत वेबसाइटवरून त्यांचे स्कोअरकार्ड पाहू शकतात. दरम्यान, महाराष्ट्रातील गजरे नीलकृष्ण निर्मलकुमार आणि दक्षेश संजय मिश्रा यांनी अनुक्रमे ऑल इंडिया रँक (AIR) १ आणि २ मिळवला. त्यानंतर हरियाणातील आरव भट्ट याने रँक ३ (AIR-3) मिळवला. राजस्थानच्या आदित्य कुमारने चौथी रँक तर हुंडेकर विदिथने पाचवी रँक मिळवली आहे. (JEE Main Result 2024 Session 2)

महाराष्ट्रातील गजरे नीलकृष्ण जेईई मेनमध्ये संपूर्ण भारतात टॉपर ठरला आहे. नीलकृष्णचे वडील शेतकरी आहेत आणि आई गृहिणी आहे. नीलकृष्ण जेईई मेन सेशन १ च्या परीक्षेतही टॉपर होता. सेशन २ परीक्षेतेही त्याने टॉप रॅंक मिळवली आहे.

संबंधित बातम्या 

एकूण ५६ विद्यार्थ्यांनी १०० टक्के गुण मिळवले आहेत. त्यापैकी तेलंगणातील १५ आणि महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेशातील प्रत्येकी सात विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

Image

JEE परीक्षा आसामी, बंगाली, इंग्रजी, गुजराती, हिंदी, कन्नड, मल्याळम, मराठी, ओडिया, पंजाबी, तमिळ, तेलगू आणि उर्दू या १३ भाषांमध्ये घेण्यात आली होती. प्रोव्हिजनल answer key १२ एप्रिल रोजी प्रसिद्ध झाली होती. सुमारे एक लाख विद्यार्थ्यांनी दुसऱ्या सेशनमध्ये पेपर १ (BE/BTech) परीक्षा दिली होती.

Image

Image

Back to top button