नाशिक : आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त शिक्षकांना योगाचे धडे | पुढारी

नाशिक : आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त शिक्षकांना योगाचे धडे

नाशिक (देवळाली कॅम्प) : पुढारी वृत्तसेवा
येथील श्रीमती विमलाबेन खिमजी तेजुकाया महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. वसंतराव पवार मेडिकल कॉलेज आणि रिसर्च सेंटरचे सचिन कापडणीस व आनंद सहाणे यांनी शिक्षक, शिक्षकेतर सेवक आणि विद्यार्थ्यांना योगाचे धडे दिले. सचिन कापडणीस यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले की, मानवाच्या जीवनात योग सदृढ शरीर व मनाला सुदृढ ठेवते. त्यामुळे मनोवैज्ञानिक विचारसरणीचा विचार करता योग देखील महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे म्हटले. यावेळी सूर्यनमस्कार, ताडासन, वृक्षासन, पादस्तासन, अर्दाचक्रासन, त्रिकोणासन, बुद्धकोनासन / भद्रासन, शशांकासन यांसारखी काही योगासनांचे प्रात्यक्षिक सादर केली. त्याचप्रमाणे तसेच अर्धास्त्रासन, वक्रासन, भुजंगासन, मक्रासन, शेतुबंधासन, पवनमुक्तासन, कपालभाती, प्राणायाम आणि ध्यान आणि त्यांचे फायदे याविषयी माहिती दिली. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एस. काळे, उपप्राचार्य डी. टी. जाधव, महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. एस. के. शिंदे व शारीरिक शिक्षण संचालक एन. आर. काकड व इतर तंत्रशिक्षण शिक्षकेतर सदस्य उपस्थित होते.

Back to top button