कोल्हापूर जिल्हा परिषद अध्यक्षपदी राहुल पाटील, उपाध्यक्षपदी जयवंतराव शिंपी
कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूर जिल्हा परिषद अध्यक्षपदी काँग्रेसचे राहुल पाटील तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादीचे जयवंतराव शिंपी यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे. कोल्हापूर जिल्हा परिषद अध्यक्षपदी काँग्रेस की राष्ट्रवादी यावर जोरदार चर्चा सुरू होती.
आज दुपारी दोन वाजता होणाऱ्या सभेत याची अधिकृत घोषणा होणार आहे.
राहुल पाटील यांच्या नावाची घोषणा करण्यात आल्याने भाजप यांच्या विरोधात उमेदवार उभा करणार नसल्याने ही निवडणूक बिनविरोध होणार आहे. यापुर्वी ताराराणी आघाडीने तसे जाहीर केले होते.
अधिक वाचा :
राष्ट्रवादीच्या युवराज पाटील यांना अध्यक्षपदाच्या प्रतीक्षेत रहावे लागणार आहे.
जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात गेल्या काही दिवसांपासून ताणाताणी सुरू होती.
पदाधिकार्यांचे राजीनामे घेतल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी अध्यक्षपदावर दावा सांगितला.
पालकमंत्री पाटील यांनी तत्काळ सदस्य संख्या पाहता अध्यक्षपदावर काँग्रेसचा हक्क असल्याचे सांगितले.
तत्पूर्वी आमदार पी. एन. पाटील यांचे चिरंजीव राहुल पाटील यांनी अध्यक्षपदाच्या शर्यतीमध्ये एंट्री केली होती. त्यावेळी पदाधिकार्यांनी राजीनामे देखील दिलेले नव्हते.
अध्यक्षपद राष्ट्रवादीला मिळावे यासाठी मंत्री मुश्रीफ सुरुवातीपासून ठाम होते.
पण आ. पी. एन. पाटील यांनीही चिरंजीव राहुल पाटील यांच्यासाठी आग्रह कायम धरला. शनिवारी सायंकाळी पालकमंत्री पाटील, मंत्री मुश्रीफ व आ. पी. एन. पाटील यांच्यात शासकीय विश्रामधाम येथे अध्यक्षपदाबाबत चर्चा झाली होती.
अखेर राहुल पाटील यांच्यावर शिक्कामोतर्ब झाले आहे.