औरंगाबाद : वैज्ञानिकांच्या जयंत्या साजऱ्या होत असल्याचे खोटे अहवाल; शिक्षण विभागाचे निघाले वाभाडे | पुढारी

औरंगाबाद : वैज्ञानिकांच्या जयंत्या साजऱ्या होत असल्याचे खोटे अहवाल; शिक्षण विभागाचे निघाले वाभाडे

औरंगाबाद, पुढारी वृत्तसेवा : वैज्ञानिक व परमवीरचक्र विजेते यांच्या जयंत्या शाळेत साजऱ्या केल्या जात नाहीत. मात्र या जयंत्या साजऱ्या होत असल्याचे खोटे अहवाल सीईओंच्या सहीनिशी औरंगाबाद शिक्षण विभाग करते, असा आरोप विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांनी केला आहे. शिक्षण विभागाचे वाभाडे काढणारी त्यांची एक ऑडियो क्लिप व्हायरल झाली, असून औरंगाबाद शिक्षण विभाग काय काम करतो हे फार संशोधनाचा विषय आहे, असा टोलाही त्यांनी त्यात लगावला आहे.

विभागीय आयुक्त केंद्रेकर हे कन्नड तालुक्यातील हतनुर गावातील शाळेला भेट दिली. यानंतर शाळा कशी नसावी याचे उत्तम उदाहरण म्हणजे हतनुरची शाळा आहे. शाळेत लायब्ररी, प्रयोगशाळाही नव्हती. प्रयोगशाळेचे कपाटाला जाळे लागलेले आढळले. तसेच वैज्ञानिकांची जयंती साजरी करायला सांगण्यात आली होती. मात्र, शाळेत कोणतीही जयंती साजरी होत नव्हती. कोणत्याही वैज्ञानिकाचा फोटो नाही, परमवीरचक्र विजेत्याचा फोटो असल्याचे केंद्रेकरांना आढळले. त्यामुळे त्यांनी तहसिलदारांना दोन शाळा तपासण्याचे आदेश दिले. त्या ठिकाणी हीच परिस्थिती आढळल्याचा अहवाल आला. दहावीच्या विद्यार्थ्यांना शास्त्रज्ञांची नावे सांगा म्हटल्यावर ते पंडित नेहरू, महात्मा गांधी अशी उत्तरे देत आहेत. शाळांमध्ये वैज्ञानिक व परमवीरचक्र विजेत्यांचे फोटोच नाही अन् शिक्षक तसेच शिक्षणाधिकारी जयंत्या साजऱ्या केल्या जात असल्याचे खोटे अहवाल सादर करत आहेत, असे केंद्रेकर यावेळी म्हणाले.

नविन सीईओ तर आयएएस अधिकारी….

औरंगाबाद जिल्ह्यातील शिक्षणाच्या परिस्थितीकडे स्वत: सीईओंनी याकडे लक्ष द्यावे. सीईओ हे आयएएस दर्जाचे अधिकारी असताना अशी परिस्थिती खाली निर्माण होत असेल तर त्यावर नियंत्रण नाही असाच अर्थ होतो. त्यामुळे आता नविन सीईओकडून मोठी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. जिल्हाधिकारी यांच्याशी समन्वय साधा अन् सर्व लोकांनी सर्व अधिकारी तहसिलदार, जिल्हा परिषदेचे अधिकारी यांनी गावात गेल्यावर शाळेत जाणे सक्तीचे करण्यात यावे, जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार, या पाच सहा गोष्टी पहायला सांगाव्या, असे म्हटले आहे.

सदर ऑडियो क्लिप ही अंतर्गत बैठकीतील बोलण्याची आहे कशी व्हायरल झाली माहिती नाही. पुढे शाळा तपासणी बाबतीतील पत्र निघतील. सीईओ ते काढतील.

– सुनिल केंद्रेकर, विभागीय आयुक्त.

हेही वाचलंत का?

Back to top button