ई बसमधून वेरूळला पर्यटन वारी; १४ बस सेवेत रुजू | पुढारी

ई बसमधून वेरूळला पर्यटन वारी; १४ बस सेवेत रुजू

औरंगाबाद, पुढारी वृत्तसेवा : वेरूळ लेणीचा विस्तार पाहता पर्यटकांना वेळेत व आरामदायी पर्यटनाचा आनंद घेता यावा यासाठी पुरातत्व विभागाच्या वतीने पर्यावरण पुरक अशा ई बसची सेवा सुरू केली आहे. या बससेवेमुळे वायु प्रदूषणावर मोठ्या प्रमाणात आळा बसणार आहे. पर्यटकांना लेणी अंतर्गत फिरण्यासाठी आज 14 बस सेवेत रुजू झाल्या आहेत.

वेरूळ लेण्या सुमारे 3 ते 4 किलोमीटरच्या विस्तारित जागेत पसरलेली आहे. या ठिकाणी 1 ते 34 अशा लेणी आहेत. 1 ते 16 लेण्या या प्रवेशद्वारांजवळच असल्याने पर्यटक ते एकाच वेळी पाहतात, परंतु त्यानंतरच्या लेण्या पाहण्यांसाठी पर्यटकांना पायी किंवा आपापल्या वाहनांचा वापर करावा लागत होता. खासगी वाहनांमुळे लेणी परिसरातील वायु प्रदूषणात वाढ होत होती. त्यासाळी पर्यावरण पुरक ई बसची मागणी अनेक दिवसांपासून होती. ती नुकतीच पूर्ण झाली असून वेरुळ लेणी येथे 14 ई बस सेवा देत आहेत. सध्या 6 सीटच्या 2, 14 सीटच्या-2 तर 8 सीटच्या 10 बस सेवा देत आहेत.

30 रुपये शुल्क
16 ते 34 लेण्यां पाहुण परत येण्यासाठी जाणाऱ्या पर्यटकांना 30 रुपये शुल्क आकारण्यात येत आहे. वेळेत आणि पर्यावरणपुरक बसचे शुल्क हे माफक असल्याची प्रतिक्रिया पर्यटकांनी दिली.

400 पर्यटक घेतात लाभ  

दरम्यान वेरूळ येथील लेणी अंतर्गत पर्यटनासाठी दिलेल्या 14 बस दिवसभरात सुमारे 15 फेऱ्या मारतात, यामुळे दिवसभरात सुमारे 400 व त्यापेक्षाही जास्त पर्यटक याचा लाभ घेत आहेत.

Back to top button