सोलापूर : ‘स्मार्ट सिटी’च्या धर्तीवर आता ‘स्मार्टनगर’ अभियान | पुढारी

सोलापूर : ‘स्मार्ट सिटी’च्या धर्तीवर आता ‘स्मार्टनगर’ अभियान

सोलापूर :  पुढारी वृत्तसेवा नगर विकास विभागा मार्फत राज्यातील सर्व नागरी स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये शहर सौंदर्यीकरण अभियान हाती घेण्यात येणार आहे. राज्यातील सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये ही अभियान राबविण्यात येणार आहे.त्यासाठी नगरविकास विभागाच्या वतीने काही मार्गदर्शनक सूचना जारी केल्या आहेत.

शहर सौंदर्यीकरण अभियानाच्या अंमलबजावणीसाठी शहराच्या नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेअंतर्गत असणार्या आयुक्त, मुख्याधिकारी, शहर अभियंता , नगर अभियंता, नगर रचनाकार, आरोग्य विभाग, स्वच्छता अधिकारी, निंमंत्रित सदस्य अधिकृत बांधकाम विकासक संघटनांचे प्रतिनिधी, वास्तुविशारद, नामांकित शैक्षणिक संस्था, औद्योगिक संस्था, व कलाकार यांचे प्रतिनिधी याचा एक कार्यकारी गट बनविणत्यात येणार आहे. तर या गटाने शहरातील स्वच्छता, जागांची निश्चिती आणि शहराचे सौंदर्यीकरणाचे नव नव्या संकल्पना मांडायच्या आहेत.

तर या गोष्टी करताना स्थानिक संस्कृती, शहराची पंरपरा व शहराचा इतिहास जोपासता येईल याची काळजी घ्यावी, शहराची ओळख निर्माण करण्यासाठी शहराचे ब्रँडिग करावे, ही कामे करीत असताना लोकसहभाग आणि सीएसआर निधीचा जास्तीत जास्त वापर करावा, शहरातील महत्त्वाच्या कामासाठी त्या -त्या स्थानिक स्वराज संस्थाच्या स्वनिधीचा वापर करण्याच्या सूचना ही शासनो केल्या आहेत.शहर सौंदर्यीकरणाच्या कामात प्लास्टीकचा वापर टाळावा, हे अभियान यशस्वीरित्या राबविणार्या नागरी संस्थाना प्रोत्साहनपर बक्षिस योजना राबविण्यात यावी, अशा सूचना ही यावेळी करण्यात आल्या आहेत.

शहरातील मध्यवर्ती चौकाची स्वच्छता, सुशोभीकरण, भिंत्ती चित्रे, कारंजे, शिल्प उभारणे, त्यावर सामाजिक संदेश देणे, जागृती करणे, शहरातील दुभाजकांची स्वच्छता राखणे, त्या ठिकाणी वृक्ष लागवड करणे, शहरातील प्रमुख इमारती, शाळा, महाविद्यालये, इेरिटेज इमारती यांच्या बाहेर समर्पक भित्ती चित्रे रेखाटणे, शहरातील भुयारी मार्ग, फूट ओव्हर ब्रिज, उड्डाणपूल सुशोभीत करणे, तलाव जलाशये व विहिरी सुशोभीकरण करणे, तलाव परिसराची स्वच्छता करणे, मलनिस्सारण वाहिन्यांचा जलाशयामध्ये निचरा होणार नाही याची दक्षता घेणे, शहरातील शिल्पे, कारंजे, जलाशये प्रमुख ठिकाणी एलईडी प्रकाश योजना व रोषणाई करणे, शहरातील उद्यानाची स्वच्छता करणे, लँड स्केपिंग तसेच थीम बेस्ड बगीचे वृक्ष लागवड करणे, शहरातील झोपडपट्टी, गावठाण परिसराची स्वच्छता करुन त्यांचे सुशोभीकरण करणे.

शहरामध्ये होणार सेल्फी पॉईंट

शहरामध्ये आकर्षक सेल्फी पॉईंटची निर्मिती करायची आहे. त्याचबरोबर शहराचे सुशोभीकरण करणे, दुकानावरील नामफलक हे साधारण एकाच प्रकारातील व रंगसंतीतीत करण्यसाठी प्रोत्साहित करणे, शहरातील सूचना फलक, चिन्ह फलक दिशादर्शक यांच्या एकसूत्रीकरण करणे यासारखी कामे हाती घेण्यात येणार आहेत.

Back to top button