अबब..! जागा 125 अन् अर्ज 550 | पुढारी

अबब..! जागा 125 अन् अर्ज 550

सोलापूर ः पुढारी वृत्तसेवा आई किंवा वडील गमावलेल्या बालकांसाठी राबविण्यात येणार्‍या ‘बालसंगोपन’ योजनेसाठी 125 जागांची मर्यादा सोलापूर जिल्ह्याला देण्यात आली आहे. प्रत्यक्षात 550 बालसंगोपनसाठी अर्ज आले आहेत. उर्वरित बालकांची संगोपनाची जबाबदारी स्वीकारणार कोण, असा प्रश्न निर्माण झाला आहे. शासनाच्यावतीने लहान मुलांचे राहणीमान, त्यांचे शिक्षण तसेच त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी विविध योजना राबविल्या जातात. त्या योजनेपैकी ‘बालसंगोपन’ योजनादेखील जिल्ह्यातील महिला बालविकास कार्यालयाकडून राबविली जात आहे.

या योजनेेमुळे 0 ते 18 वयोगटातील अनाथ, निरीक्षत, बेघर व अन्यप्रकारे आप्तीत असलेल्या बालकांचे संस्थाबाह्य आणि कौटुंबिक वातावरणात संगोपन व्हावे याद़ृष्टीने या योजनेचा उद्देश आहे. सध्या या योजनेसाठी प्रत्येक तालुक्यातील संस्थामधील बालसंगोपनच्या जागा फुल्ल भरल्या आहेत. मात्र जिल्हा कार्यालयाच्या अंतर्गत 125 जागा आहेत. या 125 जागांसाठी 550 अर्ज आल्याने जवळपास 425 मुलांचे संगोपन करणार कोण, असा प्रश्न निर्माण होणार आहे. दरम्यान, बालसंगोपनसाठी अर्ज मोठ्या प्रमाणात येत आहेत. मात्र महिला बालविकास कार्यालयाकडे पुरेसे मनुष्यबळ नसल्यामुळे गृहभेटी देण्यासाठी व इतर संनियत्रंण करण्यासाठी पुरेसे मनुष्यबळ नसल्यामुळे अडचणी निर्माण होत आहेत.

Back to top button