प्रसार माध्यमांशी बोलताना तारतम्य बाळगा | पुढारी

प्रसार माध्यमांशी बोलताना तारतम्य बाळगा

सोलापूर : पुढारी वृत्तसेवा :  ग्लोबल टीचर पुरस्कार विजेेते रणजित डिसले गुरुजींच्या प्रकरणावरून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी प्राथमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांना लेखी समज दिली असून, प्रसार माध्यमांशी बोलताना योग्य माहिती घेवून बोला अशा सूचना मुख्यकार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी दिल्या आहेत.

डिसले गुरुजी यांना फुलराईट संस्थेची शिष्यवृत्ती मंजूर झाली होती. त्यानुसार पी.एचडी करण्याकरता ऑगस्ट महिन्यात डिसले यांना रितसर रजा हवी होती. डिसले गुरुजींना प्रशासनाने रजा मंजूर केली खरी; पण यापूर्वी त्यांनी केलेल्या कामांची चौकशी लावली होती. त्यामुळे कारवाई होईल या भीतीने डिसले गुरुजींनी राजीनामा सादर केला. या प्रकरणी शिक्षणाधिकारी लोहार यांनी माहिती घेऊनच भाष्य करावे, अशा सूचना स्वामी यांनी दिल्या आहेत.

Back to top button