नांदेड : वीज पडून तीन शेतकर्‍यांचा मृत्यू | पुढारी

नांदेड : वीज पडून तीन शेतकर्‍यांचा मृत्यू

नांदेड, पुढारी वृत्तसेवा : भोकर तालुक्यातील पाळज शिवारात मंगळवारी सायंकाळी पाच वाजता पेरणी करत असताना वीज पडून तीन शेतकर्‍यांचा मृत्यू झाला. या भागात पावसाच्या सरी कोसळल्यानंतर काही शेतकर्‍यांनी मंगळवारपासून पेरणी करण्यास सुरूवात केली. परंतु संध्याकाळी ढगाळ वातावरण व जोराचे वारे वाहू लागले. अचानक ढगांचा गडगडाट होऊन वीजेचे लोळ साईनाथ सातमवार (30), राजेश् वर चटलावार (40), बोजना रामनवार (32) या शेतकर्‍यांच्या अंगावर पडले.

हेही वाचा :

Back to top button