औरंगाबाद : जिन्सीच्या पोलिस निरीक्षकावर ठाण्यातच चाकूहल्‍ला | पुढारी

औरंगाबाद : जिन्सीच्या पोलिस निरीक्षकावर ठाण्यातच चाकूहल्‍ला

औरंगाबाद, पुढारी वृत्तसेवा : जिन्सी ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक व्यंकटेश केंद्रे यांच्यावर ठाण्याच्या आवारातच काही दिवसांपूर्वी स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या पोलिस कर्मचार्‍याने जिवघेणा चाकूहल्‍ला केला. केंद्रे यांच्या छाती आणि पोटात चाकू खुपसण्यात आला असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. मंगळवारी रात्री पावणेनऊ वाजेच्या सुमारास ही गंभीर घटना घडली.

मुजाहेद शेख, असे हल्‍लेखोराचे नाव आहे. तो पोलिस कर्मचारी होता. 5 जून रोजीच त्याने स्वेच्छानिवृत्ती घेतल्याचे एका वरिष्ठ पोलिस अधिकार्‍याने सांगितले. अधिक माहिती अशी की, पोलिस निरीक्षक केंद्रे हे तीन वर्षांपासून जिन्सी ठाण्यात वरिष्ठ निरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. दरम्यान, हल्‍लेखोर मुजाहेद हा जिन्सी ठाण्यातच जिन्सीच्या पोलिस निरीक्षकावर ठाण्यातच चाकूहल्‍ला पोलिस नाईक म्हणून कर्तव्यावर होता.

तो कामात सतत चुका करायचा. ठाण्यात आलेल्या तक्रारदारांनाही अरेरावी करायचा. त्यावरून केंद्रे यांनी त्याला सुनावले होते. तेव्हापासून त्यांच्यातील मतभेद वाढत गेले. केंद्रे यांनी अनेकदा त्याचे कसुरी अहवाल पाठविले होते. दरम्यान, यंदाच्या बदल्यांमध्ये त्याची बेगमपुरा येथे बदलीदेखील झाली होती. तत्पूर्वीच 5 जून रोजी त्याची स्वेच्छानिवृत्ती मंजूर झाली. तो सध्या पोलिस कर्मचारी
नव्हता. रुग्णालयात उपचारासाठी धावधाव पोलिस निरीक्षक केंद्रे यांच्यावरच चाकूहल्‍ला केल्याची वार्ता क्षणात वाऱ्यासारखी शहरभर पसरली.

पोलिस आयुक्‍त डॉ. निखिल गुप्ता, उपायुक्‍त अपर्णा गिते, दीपक गिऱ्हे यांच्यासह सहायक आयुक्‍त निशिकांत भुजबळ, पोलिस निरीक्षक अविनाश आघाव यांच्यासह शहरातील सर्वच ठाण्याचे निरीक्षक रुग्णालयात दाखल झाले. गुप्ता यांच्यापासून सर्वांनी उपचारासाठी धावाधाव केली. रक्‍तस्राव थांबत नसल्याने ऑपरेशनचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी रक्‍ताची गरज पडली तर तत्काळ रक्‍तदेखील उपलब्ध करून देण्यात आले.

रात्री उशिरापर्यंत ऑपरेशन यशस्वी पार पडले होते. केंद्रे यांची प्रकृती स्थिर पण चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहेहल्‍लेखोर शेख वादग्रस्तच पोलिस निरीक्षक केंद्रे यांच्यावर हल्‍ला करणारा आरोपी मुजाहेद शेख हा सुरुवातीपासून वादग्रस्त कर्मचारी राहिला आहे.. चुकीची कामे केली तरी मला वरिष्ठांनी जाब विचारू नये, सतत मी म्हणतो तेच बरोबर, तक्रारदारासमोर वरिष्ठांनी माझीच बाजू घ्यायला पाहिजे, अशा भांडखोर स्वभावाचा मुजाहेद होता.

तो सतत नशेतच राहायचा, अशी चर्चा आहे. ठाण्यातही तो सतत वादग्रस्त राहिला आहे. त्याला ज्या पोलिस कर्मचार्‍यांनी उपचारासाठी घाटीत दाखल केले त्या कर्मचार्‍यांनाही त्याने कपडे फाडले व मारहाण केली. स्वत:ला चाकू मारून घेतला केंद्रे यांच्यावर जीवघेणा हल्‍ला केलेल्या आरोपी मुजाहेद शेख याने घटनेनंतर लगेचच स्वत:च्या हातावरदेखील चाकू मारून घेतल्याचे ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी सांगितले.

पोलिसांनी त्याला जागीच पकडून ठेवले. तसेच, त्याच्या हाताला जखम झाल्याने  त्याला घाटीत दाखल केले आहे. यापूर्वी झाला होता बडतर्फ हल्‍लेखोर मुजाहेद शेख याने विशेष शाखेचे तत्कालिन पोलिस निरीक्षक सोपान बोरसे यांच्यावरही हल्‍ला केला होता. त्या प्रकरणात त्याला बडतर्फ करण्यात आले होते.

तो अनेक वर्षे सेवेत नव्हता. दरम्यान, न्यायालयातून तो पुन्हा सेवेत हजर झाला. मुख्यालयात कर्तव्य बजावले. त्यानंतर काही वर्षांपूर्वी त्याची जिन्सी ठाण्यात नेमणूक केली होती. यंदाच्या बदल्यांमध्येदेखील त्याची जिन्सीतून बेगमपुरा ठाण्यात बदली करण्यात आली होती. मात्र, काही दिवसांपूर्वीच त्याने स् अशी घडली घटना : मंगळवारी पोलिस निरीक्षक केंद्रे यांच्या सत्काराचा कार्यक्रम होता.

गब्बर संघटनेच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यासाठी केंद्रे हे ठाण्याच्या आवारतच होते. मुजाहेद हा संध्याकाळी तेथे गेला. केंद्रे यांना पाहून त्याने लगेचच शिवीगाळ सुरू केली. ते त्याला समजावण्यासाठी जवळ जाताच मुजाहेदने आधी त्यांच्या पोटात चाकू खुपसला. काही समजण्याच्या आत त्याने पुन्हा दुसरा वार केला. दुसरा वार त्यांच्या पोट आणि छातीच्या मध्यभागी लागला. त्यांना इतर कर्मचारी व अधिकार्‍यांनी तत्काळ रुग्णालयात दाखल केले

Back to top button