बोरगावातील स्मशानभूमीचा मार्ग मोकळा | पुढारी

बोरगावातील स्मशानभूमीचा मार्ग मोकळा

अक्कलकोट : पुढारी वृत्तसेवा बोरगाव दे (ता. अक्कलकोट) येथील मागासवर्गीय समाजाच्या स्मशानभूमीचा मार्ग मोकळा झाला. असून शेतमालाकाच्या जमिनीवर शासनाने हद्द कायम करीत 10 गुठ्ठे शेतजमीन मागासवर्गीय समाजाच्या स्वाधीन केली. सन 1986 मध्ये गट क्र 432/2 ही जमीन शासनाने भूसंपादन केली होती. पुढे 1991 ला हरिजन स्मशानभूमी या नावाने नोंदही झाली.पुढे 1997 मध्ये भूमिअभिलेखकडून मोजणी करून हद्द कायम करण्यात आली होती. मात्र संबंधित शेतमालकाच्या हरकतीमुळे सदरचा विषय प्रलंबित राहिला.तेव्हा पासून म्हणजे जवळपास 25 वर्षांपासून बोरगाव येथील मागासवर्गीय समाज आपल्या हक्काच्या स्मशानभूमीसाठी संघर्ष करीत होते.

परिणामी हक्काची स्मशानभूमीची जागा असूनही गेल्या 25 वर्षापासून मृतदेहावर अंत्यसंस्कार कुठे करायचे हा प्रश्न होता. शेतमालक व मागासवर्गीय समाज यांच्यात अनेकदा वादाची परिस्थिती निर्माण होत होती. मागासवर्गीय समाजातील लोकांनी सतत कागदोपत्री पाठपुरावा केला.अक्कलकोटचे तहसीलदार बाळासाहेब शिरसट यांनी सशुल्क पोलीस संरक्षण पुरवणे बाबत मागणी केली होती. दि 17 जून रोजी मंडळ अधिकारी ए.सी जमादार, तलाठी विष्णू चोरमुले भूकरमापक प्रभाकर शिंदे,सरपंच विलासराव सुरवसे, पोलीस पाटील अभिजित पाटील, वागदरी बीटचे पोलिस हवालदार विपीन सुरवसे, पो कॉ. माळी व्ही एम, कोतवाल सुनील मुलगे यांच्या उपस्थित बोरगाव येथील हरिजन समाज स्मशानभूमीचे दहा गुंठे शेतजमीन हद्द कायम करीत समाजाच्या स्वाधीन करण्यात आली.

Back to top button