नगर : … अखेर तिला ‘दे धक्का’ करीत नेली बसस्थानकात | पुढारी

नगर : ... अखेर तिला ‘दे धक्का’ करीत नेली बसस्थानकात

संगमनेर शहर : पुढारी वृत्तसेवा : काँग्रेसचे आंदोलन सुरू असताना नगर आगाराची बस बंद पडली अन् आंदोलनावरील लक्ष विचलीत होवू लागल्याने अखेर आंदोलकांनीच पोलिसांच्या मदतीने ‘दे धक्का’ करीत बसस्थानकात नेवून सोडली आहे.
काँग्रेस पक्षाच्या हंगामी अध्यक्षा सोनीया गांधी आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांची सक्तवसुली संचनालयाकडून चौकशी सुरु झाल्याच्या निषेधार्थ संगमनेरात काँग्रेसचे धरणे आंदोलन करण्यात आले.

त्याचवेळी नगरहून नाशिकच्या दिशेने चाललेली बस (एमएच.एच.06, एस.8452) संगमनेर बसस्थानकाजवळ पोहोचली. आंदोलनाला मोठी गर्दी झाल्याने नाशिक-पुणे महामार्गावरील वाहतूक रेंगाळली होती. त्यातच भररस्त्यातच बंद ती पडली. आंदोलनावरील लक्ष विचलीत होवून सगळ्यांचे लक्ष बंद पडलेली बसकडे गेले बंद पडलेल्या बसची ‘ढकलगाडी’ करीत थेट बसस्थानकातच नेवून सोडली.

Back to top button