सिंधुदुर्ग जिल्ह्यात ४८५ पॉझिटिव्ह; ८ मृत्यू | पुढारी

सिंधुदुर्ग जिल्ह्यात ४८५ पॉझिटिव्ह; ८ मृत्यू

सिंधुदुर्गनगरी :  पुढारी वृत्तसेवा

जिल्ह्यातील कोरोना स्थिती अद्यापही तशीच आहे. सोमवारी आणखी 8 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. यामुळे मृत होणार्‍यांची जिल्ह्यातील एकूण संख्या 875 झाली आहे. तर सोमवारी आणखी 485 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. यामुळे आतापर्यंत एकूण पॉझिटिव्ह रुग्णसंख्या 34 हजार 706 झाली आहे. सोमवारी मिळालेल्या रुग्णांमध्ये सर्वात अधिक 107 रुग्ण मालवण तालुक्यात मिळाले आहेत. जिल्ह्यातील एकूण कोरोना पॉझिटिव्ह रुग्णसंख्या 33 हजार 706 झाली आहे. सक्रिय रुग्णसंख्या 6 हजार 862 आहे. तर,  390 रुग्ण जिल्ह्यात चिंताजनक स्थितीत आहेत.  तर 519 रुग्ण कोरोनामुक्‍त झाले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.

14 दिवसांत तब्बल 192 मृत

1 ते 14 जून या 14 दिवसांत तब्बल 192 जणांचे मृत्यू कोरोनामुळे झाले आहेत. 1 जून रोजी 10,2 जून 11 , 3 जून 9, 4 जून 15 , 5 जून 16,6 जून 13, 7  जून 12, 8 जून 20, 9 जून 14,10 जून 17, 11 जून 13, 12 जून 22, 13 जून 12, 14 जून रोजी 8 जणांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात  आतापर्यंत 1 लाख 25 हजार 440 आरटीपीसीआर तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 24 हजार 591 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. तर 1 लाख 16 हजार 548 नमुन्यांची अँटी जन टेस्ट करण्यात आली असून त्यापैकी 10 हजार 360 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.

सोमवारचे पॉझिटिव्ह रुग्ण 485

सोमवारी एका दिवसात एकूण 485 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. या दिवशी एकूण 5 हजार 587 नमुने तपासण्यात आले आहेत. तालुकानिहाय रुग्ण देवगड 75, दोडामार्ग 32, कणकवली 99, कुडाळ 49,  मालवण 107, सावंतवाडी 80, वैभववाडी 20, वेंगुर्ला 26, जिल्ह्याबाहेरील 0.

तालुकानिहाय पॉझिटिव्ह रुग्ण

देवगड 4,204, दोडामार्ग 2089, कणकवली 6,672, कुडाळ 6,823, मालवण 5022, सावंतवाडी 5098, वैभववाडी 1,547, वेंगुर्ला 2,975, जिल्ह्याबाहेरील 174.

तालुकानिहाय आजपर्यंतचे मृत्यू

देवगड 121, दोडामार्ग 26, कणकवली 177, कुडाळ 136, मालवण 157, सावंतवाडी 128, वैभववाडी 59, वेंगुर्ला 67 आणि जिल्ह्याबाहेरील 4 व्यक्‍तींचा यामध्ये समावेश आहे.

 

Back to top button