मराठ्यांना आरक्षण द्यायचे ठाकरे सरकारच्या मनात नाही : निलेश राणे | पुढारी

मराठ्यांना आरक्षण द्यायचे ठाकरे सरकारच्या मनात नाही : निलेश राणे

जळगाव पुढारी वृत्तसेवा : मराठा आरक्षण प्रश्‍नी राज्‍य सरकार केंद्रावर आरोप करीत आहेत. मात्र त्यांना आरक्षणाचा विषय लक्षात येत नाही. म्हणूनच राज्‍य सरकारने याेग्‍य पद्धतीने न्यायालयात बाजू न मांडल्यामुळे मराठाआरक्षण मिळाले नाही. आरक्षण देण्‍याचे ठाकरे सरकारच्या मनातच नाही, असा आरोप माजी खासदार निलेश राणे यांनी ठाकरे सरकारवर केला. ते जळगाव येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.

वाचा : जळगाव जिल्ह्यातील ५१ गुन्हेगार हद्दपार!

माजी खासदार निलेश राणे हे जळगाव जिल्हा दौर्‍यावर आले होते. त्यांनी भाजपच्या जिल्हा कार्यालयात दुपारी पत्रकार परिषद  घेतली. यावेळी पक्षाचे जिल्हाध्यक्ष आमदार राजूमामा भोळे, महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी आदी उपस्थित होते.यावेळी निलेश राणे म्हणाले, ठाकरे सरकारने मराठा आरक्षणाचा विषय समजून घेण्याचा कधीच प्रयत्न केलेला नाही. हे सरकार आजपर्यंत खोटे बोलत आले आहे. मराठा आरक्षण न मिळण्यामागे ठाकरे सरकारच जबाबदार असल्याचा त्यांनी आरोप केला.

वाचा : जळगाव : फूस लावून अल्पवयीन मुलीस पळविले

ठाकरे सरकारच्या मनात मराठ्यांना आरक्षण द्यायचे नाही . त्यांना फक्त फिरवाफिरव करायची आहे. मूळ विषय कोणीच समजून घेत नाही, असेही ते म्‍हणाले.  राज्य सरकार व वकील मंडळी न्यायालयात कमी पडली न्यायालयात अनेक गोष्टी सादर केल्या गेल्या नाहीत, असा दावाही निलेश राणे यांनी केला. 

 

Back to top button