मानवी साखळीतून सीएएचे समर्थन | पुढारी | पुढारी

मानवी साखळीतून सीएएचे समर्थन | पुढारी

नाशिक : प्रतिनिधी

नागरिकत्व संशोधन कायद्याच्या समर्थनार्थ रविवारी (दि.29) शहरात ठिकठिकाणी मानवी साखळी करण्यात आली. प्रबोधन मंचतर्फे आयोजित करण्यात आलेल्या या मानवी साखळीत नाशिककरांनी  उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. इंदिरानगर बोगदा ते गंगापूर रोडवरील चोपडा लॉन्सदरम्यान, काढण्यात आलेल्या बाइक रॅलीत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, माजीमंत्री गिरीश महाजन सहभागी झाले.

‘शरणार्थीओके सन्मानमे हम सब मैदान मे; वुई सपोर्ट सीएए ’ असे फलक घेतलेले नागरिक मानवी साखळीत सहभागी झाले. शहरातील राज स्वीट चौक मेरी रस्ता, मानूर नाका, पंचवटी कारंजा, शालिमार येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, बीवायके महाविद्यालय, सातपूर बसस्टॅण्ड, पवननगर मार्केट, शिवाजी चौक, माउली लॉन्स् चौक, रथचक्र चौक, इंदिरानगर; पाथर्डी फाटा, बनकर चौक, काठेगल्‍ली, बिटको चौक, नाशिकरोड येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, जेलरोड, जुना बसस्टॅण्ड, देवळाली व भगूर आदी ठिकाणी मानवी साखळी करून सीएएचे समर्थन करण्यात आले.  यावेळी मानवी साखळीत युवक-युवतींचा समावेश लक्ष वेधून घेत होता.

Back to top button