‘कान्स’मध्ये जाणारा ‘पिफ’ हा एकमेव चित्रपट महोत्सव | पुढारी

‘कान्स’मध्ये जाणारा ‘पिफ’ हा एकमेव चित्रपट महोत्सव

पुणे : पुढारी वृत्तसेवा

राज्य सरकार आणि पुणे फिल्म फाउंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात येणार्‍या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या (पिफ) कार्याची आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल घेण्यात आली आहे. येत्या 17 ते 28 मे दरम्यान फ्रान्स येथे होणार्‍या जगप्रसिद्ध कान्स चित्रपट महोत्सवातील ‘द फेस्टिव्हल हब’ या विभागात होणार्‍या एका विशेष चर्चासत्रात सहभागी होण्यासाठी ‘पिफ’ला निमंत्रण देण्यात आले आहे. या विभागात सहभागी होण्यासाठी निमंत्रण मिळालेला ‘पिफ’ हा भारतातील एकमेव चित्रपट महोत्सव आहे.

१ हजार नव्‍हे ३ हजार कोटींचा घोटाळा, आशिष शेलारांकडून भूखंड घोटाळ्याप्रकरणी पुन्‍हा आरोप

पिफव्यतिरिक्त दक्षिण कोरियातील बुचेओन इंटरनॅशनल फॅन्टास्टिक फिल्म फेस्टिव्हल, झेक प्रजासत्ताक येथील कार्लोव्ही वरी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल आणि बीएफआय लंडन फिल्म फेस्टिव्हल या महोत्सवाच्या प्रतिनिधींनादेखील या चर्चासत्रात निमंत्रित केले गेले आहे. ‘द न्यू एरा ऑफ फेस्टिव्हल्स – एक्सपांडिंग बियाँड हायब्रीड’ या विषयावर असलेले हे चर्चासत्र 19 मे रोजी स्थानिक वेळेनुसार सकाळी 11 वाजता कान्स महोत्सवातील मरीना स्टेज रिव्हिएरा येथे होईल. जगभरातील प्रेक्षकांना यात ऑनलाईन पद्धतीने सहभागी होता येईल. जगभरातील महोत्सव जे सातत्याने जागतिक, प्रादेशिक चित्रपटाचा प्रचार आणि प्रसार वेगवेगळ्या शहरात करत आहेत, त्यांना एकाच व्यासपीठावर आणणे हा चर्चासत्राचा उद्देश आहे. या चर्चासत्रात ‘पिफ’चे संचालक डॉ. जब्बार पटेल सहभागी होणार आहेत.

उत्तर प्रदेश सरकारचे मुंबईत कार्यालय, योगी सरकारचा मोठा निर्णय

डॉ. पटेल म्हणाले, ‘गेली 20 वर्षे आम्ही घेत असलेल्या अविरत प्रयत्नांना या निमंत्रणाच्या रूपात मिळालेली ही दाद आहे. महोत्सवाला एका शहरापुरते मर्यादित न ठेवता, पुणे, मुंबई, नागपूर, लातूर, सोलापूर येथे जागतिक, प्रादेशिक चित्रपटाच्या प्रचार आणि प्रसारासाठीची कामगिरी, कोरोना काळातील बदललेल्या आव्हानात्मक परिस्थितीला अनुसरून महोत्सवाचे यशस्वी आयोजन आदी बाबींची दखल या निमित्ताने एका मोठ्या आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर घेण्यात आली आहे याचा आम्हाला विशेष अभिमान आहे.’

हेही वाचा

The Kashmir Files : विवेक अग्निहोत्रीच्या द कश्मीर फाईल्सवर सिंगापूरमध्ये बंदी

महाराष्ट्र भ्रष्टाचारमुक्त करायला निघालेलेच सर्वात भ्रष्ट; संजय राऊतांचा सोमय्यांवर आरोप

Pandit Shivkumar Sharma : ज्‍येष्‍ठ संतूरवादक पंडित शिवकुमार शर्मा यांचे निधन

Back to top button