औरंगाबाद : अमित ठाकरेंनी केली सभास्थळाची पाहणी | पुढारी

औरंगाबाद : अमित ठाकरेंनी केली सभास्थळाची पाहणी

औरंगाबाद : पुढारी वृत्तसेवा : मनसे नेते अमित ठाकरे यांनी शनिवारी (दि.३०) सकाळी सांस्कृतिक मंडळ मैदानावर भेट देत येथे सुरु असलेल्या कामांचा आढावा घेतला. यावेळी उपस्थित मनसेच्या पदाधिकाऱ्यांना काही सुचनाही केल्या. या मैदानावर उद्या (दि. १) मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची जाहीर सभा होणार आहे.

राज ठाकरेंच्या सभेपूर्वी सुरु असलेल्या कामांचा आढावा घेण्यासाठी मनसे नेते अमित ठाकरे काल शुक्रवारी रात्री उशिरा औरंगाबाद शहरात दाखल झाले. येथील पंचतारांकीत हॉटेलमध्ये ते मुक्कामी होते. शनिवारी सकाळी त्यांनी सभास्थळाला भेट देत पाहणी केली. तसेच सभेसाठी जिल्ह्याबाहेरून येणाऱ्या वाहनांसाठी शहरातील कर्णपूरा मैदानावर पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. या ठिकाणी भेट देत अमित ठाकरेंनी नियोजनासाठी काही सुचना केल्या. येथील कर्णपुरा देवीचे दर्शन घेत त्यांनी आरती केली. यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी राज ठाकरेंनी घेतलेला भोंग्याचा विषय धार्मिक नसून सामाजिक असल्याचे सांगितले.

हेही वाचलंत का ? 

  • Google : गुगल सर्चमधील वैयक्तिक माहिती आता हटविता येणार
  • Fruit eat time : फळे खातायं; मग ‘या’ टिप्स तुमच्यासाठी…
  • रागिनी खन्ना : गोविंदाच्या गाण्यावर भाचीचे जबरी ठुमके

Back to top button