Motorola X30 Pro: Motorola ने लॉन्च केला 200 मेगापिक्सल कॅमेरा असलेला जगातील पहिला स्मार्ट फोन | पुढारी

Motorola X30 Pro: Motorola ने लॉन्च केला 200 मेगापिक्सल कॅमेरा असलेला जगातील पहिला स्मार्ट फोन

पुढारी ऑनलाईन: अनेक दिवसांच्या अफवांनंतर अखेर Motorola कंपनीने Motorola X30 Pro हा स्मार्टफोन लॉन्च केला आहे. याचे वैशिष्ट्ये म्हणजे 200 मेगापिक्सल कॅमेरा असलेला हा जगातील पहिला स्मार्टफोन आहे. यामध्ये बॅटरीबॅकअपसह अनेक दमदार फीचर्स कंपनीने यूजर्ससाठी दिले आहेत. यामध्ये डिस्प्लेला चारीही बाजूने प्रोटेक्ट कव्हर दिला आहे. तसेच या फोनच्या बॅककव्हरला इमेज सेन्सर देण्यात आला आहे. जाणून घेऊया काय आहे या स्मार्टफोनची वैशिष्ट्ये…

Motorola X30 Pro ची किंमत

Motorola X30 Pro च्या 8GB/128GB मॉडेलची किंमत CNY 3,699 (जवळपास 43,600 रुपये) , Moto X30 Pro 12GB/256GB मॉडेलची किंमत CNY 4,199 (जवळपास 49,600 रुपये) , 12GB/512GB 256GB मॉडेलची किंमत CNY 4,499 (53,150 रुपये) इतकी आहे. परंतु, Motorola कंपनीने भारत आणि इतर बाजारांमध्ये Moto X30 Pro या स्मार्टफोनची किंमत आणि उपलब्धता याबद्दल अद्याप कोणतीही माहिती स्पष्ट केलेली नाही.

Motorola X30 Pro ची वैशिष्ट्ये

  • Motorola X30 Pro या स्मार्ट फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 8+ Gen 1 चिप आहे. यामध्ये 12GB पर्यंत LPDDR5 RAM आहे. Motorola X30 Pro मध्ये 6.73-इंच FHD+ pOLED डिस्प्ले आहे. 10-बिट पॅनेलबूस्ट 144Hz रीफ्रेशरेट आणि 1,200 nits चा शिखर ब्राइटनेस आहे. तसेच या स्मार्ट फोनमध्ये फिंगरप्रिंट रीडर आणि HDR10+ सपोर्टदेखील आहे.
  • फोटोसाठी Motorola X30 Pro मध्ये बॅकसाईडला ट्रीपल कॅमेरा आहे. यामध्ये ISO सहीत 200 MP च्या प्रायमरी ISOCELL HP1 चा सेंसर आहे. हा सेंसर 12.5 MP Resolution मध्ये फोटो कॅप्चर करते.
  • या स्मार्टफोनमध्ये सेल्फीसाठी 60 MP Omnivision चा OV60a सेंन्सर आहे. या स्मार्टफोनमध्ये 4500 Mah ची बॅटरी दिली आहे. हा स्मार्टफोन 125W वायर चार्जिंग आणि 50W वायरलेस चार्जिंगने युक्त आहे.
  • हा स्मार्टफोन 4G एलटीई, 5G, Wifi, ब्ल्यूटुथ, जीपीएस आणि इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट रीडर याला जोडण्यासाठी सक्षम आहे.

पाहा व्हिडिओ:

Back to top button