OnePlus10T 5G : काही मिनिटांमध्‍ये माेबाईल फाेन फुलचार्ज! भारतात 'हा' नवीन स्मार्टफोन लॉन्च | पुढारी

OnePlus10T 5G : काही मिनिटांमध्‍ये माेबाईल फाेन फुलचार्ज! भारतात 'हा' नवीन स्मार्टफोन लॉन्च

पुढारी ऑनलाईन:  OnePlus या स्मार्टफोन कंपनीने भारतासह जागतिक बाजारपेठेत नुकताच OnePlus10T 5G हा नवीन स्मार्टफोन लॉन्च केला आहे. जाणून घेऊया, या स्मार्टफोनमध्ये काय आहे खास ?

OnePlus10T 5G

हायस्पीड चार्ज

हा OnePlus चा सगळ्यात हायस्पीड चार्ज आणि पॉपरफूल हँडसेट म्हणून ओळखला जात आहे. यामध्ये पाॅवरफुल स्नॅपड्रॅगन 8+ Gen 1 प्रोसेसर, 150W SUPERVOOC Endurance Edition वायर्ड चार्जिंगसह, 4800mAh बॅटरी आणि 50-मेगापिक्सेल ट्रिपल रिअर कॅमेरा येतो. हा स्मार्टफोन तीन व्हेरिएंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. OnePlus 10T स्मार्टफोन हा OnePlus 8T नंतर कंपनीचा पहिला टी-सीरीज फोन आहे.

OnePlus10T 5G ची किंमत

OnePlus 10T च्या 8GB रॅम आणि 128GB स्टोरेजच्या व्हेरिएंटची किंमत 49,999 रुपये आहे.12GB रॅम आणि 256GB स्टोरेज असलेली व्हेरिएंटची किंमत 54,999 तर 16GB रॅम आणि 256GB स्टोरेज असलेल्या व्हेरिएंटची किंमत 59,999 रुपये आहे.

OnePlus10T 5G ची अशी करा खरेदी

OnePlus 10T या स्मार्टफोनचे 8GB/128GB आणि 12GB/256GB मॉडेल OnePlus.in, OnePlus Store App, Amazon, OnePlus अनन्य स्टोअर्स आणि भागीदार आउटलेटवर खरेदी करता येऊ शकतात. या स्मार्टफोनचे बुकींग 3 ऑगस्टपासून सुरू करण्यात आले आहे. ६ ऑगस्टपासून OnePlus 10T चे हे स्मार्टफोन विक्रीसाठी उपलब्ध असणार आहेत.

भरघोस ऑफर

आयसीआयसीआय बँक आणि एसबीआय बँक कार्डवर OnePlus 10T  स्मार्टफोन खरेदी केल्यास, ग्राहकांना यावर ५००० रुपयांची सूट मिळणार आहे.

हेही वाचा:

 

 

Back to top button