Har Ghar Tiranga Song : हर घर तिरंगा..घर..घर तिरंगा… रिलीज (व्हिडिओ)

Har Ghar Tiranga Song
Har Ghar Tiranga Song

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय स्वातंत्र्याचे 2022 हे अमृत महोत्सवी वर्ष आहे. या पार्श्वभूमीवर भारत सरकारने देशभर 'हर घर तिरंगा' (Har Ghar Tiranga Song) अभियान सुरू केले आहे. बुधवारी (३ ऑगस्ट) भारतीय संस्कृती, विविधतेतील एकता, गौरवशाली इतिहास सांगणारं एक गीत रिलीज केले आहे. हे गीत Amrit Mahotsav या अधिकृत ट्विटर अकाउंटवर शेअर केले आहे. हा व्हिडिओ ट्विट करत लिहले आहे की, "हर घर तिरंगा…घर घर तिरंगा…आपल्या राष्ट्राच्या स्वातंत्र्याची ७५ वर्षे पूर्ण होत असताना, आपल्या अभिमानाचे आणि एकतेचे प्रतीक असलेल्या या तिरंग्याला सुरेल सलामी देऊन आपला तिरंगा साजरा करा." आणि #harGharTiranga #amrutmahotsav असा हॅशटॅग दिला आहे.

Har Ghar Tiranga Song : या वर्षातील सर्वात मोठं देश भक्तीपर गीत 

राष्ट्राबद्दल अभिमान आणि प्रेमाची भावना पुन्हा जागृत करणार हर घर तिरंगा गाण्याच्या व्हिडिओमध्ये बॉलिवू़डपासून ते टॉलिवूडमधील कलाकार, विविध खेळातातील खेळाडू, विविध क्षेत्रातील नावाजलेले लोक या व्हिडिओमध्ये दिसत आहेत. यामध्ये बॉलिवूड बादशहा अमिताभ बच्चन, सोनू निगम, विराट कोहली, नीरज चोप्रा, प्रभास, अनुपम खेर, आशा भोसले, मीराबाई चानू, मिथाली राज, अनुष्का शर्मा आदी दिग्गज आहेत. गीताच्या सुरुवातीला अमिताभ बच्चन तिरंग्याला सलाम करताना दिसत आहेत. सोनु निगम, आशा भोसले यांनीही या गीताला आवाज दिला आहे. "हर घर तिरंगा…घर घर तिरंगा" हे गाणं या वर्षातील सर्वात मोठं देशभक्तीपर गीत ठरलं आहे.

हेही वाचलंत का?

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news