Realme ने भारतात लॉन्च केले स्मार्टवॉच, जाणून घ्या काय आहे खासियत | पुढारी

Realme ने भारतात लॉन्च केले स्मार्टवॉच, जाणून घ्या काय आहे खासियत

पुढारी ऑनलाईन: आत्तापर्यंत आपण Realme हे नाव स्मार्टफोन खरेदी करतानाच ऐकले असेल. पण सध्या Realme कंपनीने आपले नवनवीन प्रोडक्टचे गॅझेट ओपन केले आहे. यामध्ये Realme कंपनीने मंगळवारी (दि.२६) नवीन उत्पादने जाहीर केली. यामध्ये रियलमी वॉच 3 स्मार्टवॉच, बड्स एअर 3 निओ ट्रू वायरलेस इअरफोन आणि बड्स वायरलेस 2एस नेकबँड शैलीतील वायरलेस इअरफोन्सचा समावेश आहे. जाणून घेऊया Realme Watch 3 स्मार्टवॉच संदर्भात…

 

SmartWatch: Realme Watch 3

काय आहेत Realme स्मार्ट वॉचची वैशिष्ट्ये

Realme Watch 3 या स्मार्टवॉचचे सर्वात खास वैशिष्ट्ये म्हणजे ब्लूटूथ कॉलिंग, ज्यासाठी यात बिल्ट-इन मायक्रोफोन आणि स्पीकर सिस्टम आहे. एकदा पिअर केल्यानंतर हे स्मार्ट वॉच तुमच्या मोबाईलसाठी हँड्स फ्री स्पीकर डिव्हाईस म्हणून काम करते. यामध्ये 1.8-इंच TFT-LCD टच स्क्रीन आहे. ज्याचे रिझोल्यूशन 240×286 पिक्सेल आहे. याला IP68 रेटिंग मिळाले असल्याने या स्मार्टफोनवर पाणी आणि धुळीचा कोणताही परिणाम होत नाही. या स्मार्ट फोनमध्ये 110 पेक्षा जास्त फिटनेस मोड, हार्ट रेट सेन्सर, SpO2 मॉनिटर आणि स्लीप ट्रॅकिंग सेन्सर आहे. याची एकदा बॅटरी चार्ज केल्यानंतर सलग सात दिवसांचा बॅकअप देते, असा कंपनीने दावा केला आहे.

Realme Watch 3 with 340 mAh Battery Spotted on FCC; Expected to Launch Soon - MySmartPrice

Realme स्मार्ट वॉच किती किंमतीला मिळेल?

realme स्मार्ट वॉचची भारतातील किंमत ही 3499 रुपये इतकी असणार आहे. परंतु, सध्या हे स्मार्टवॉच प्रास्ताविक किंमतीला २९९९ रुपयांना खरेदी करता येऊ शकते. या स्मार्टफोनची विक्री ३ ऑगस्टपासून सुरू होणार आहे. हे स्मार्टवॉच ऑनलाईन किंवा निवडक स्टोअरमध्ये खरेदी करता येतील.

हेही वाचा :

 

 

 

Back to top button