गुगल प्ले पास भारतात लाँच; सब्‍सस्क्रिप्शन घेणार्‍या ग्राहकांना मिळणार ‘हे’ फायदे | पुढारी

गुगल प्ले पास भारतात लाँच; सब्‍सस्क्रिप्शन घेणार्‍या ग्राहकांना मिळणार 'हे' फायदे

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतात गुगलने आजपासून प्‍ले स्‍टाेअर( play store) मध्‍ये प्ले पास सेक्‍शन लाँच केले आहे. अँड्रॉईड वापरणाऱ्या ग्राहकांना या आठवड्यापासून ही सेवा मिळण्यास सुरूवात होणार आहे. गुगल प्ले पास ही एक ‘सब्‍सस्क्रिप्शन’ सेवा आहे. याची सुविधा वापरताना ग्राहकांना जाहिरात दाखवली जाणार नाही. गुगल प्ले सर्विस ही सुविधा सध्याच्या घडीला ९० देशांमध्ये उपलब्ध आहे. या सर्विसचा फायदा अँड्राईड माेबाईल वापरणाऱ्या ग्राहकांना होणार आहे.

कंपनीने दिलेल्‍या माहितीनुसार, गुगल प्ले सर्विसच्या ४१ कॅटेगिरीज मध्ये १००० पेक्षा जास्त क्युरेटेड कनेक्शन आहेत. या ४१ कॅटेगिरीज मध्ये भारतासहीत ५९ देशांचे कनेक्शन सामाविष्ट होणार आहेत. ॲक्सेस करण्यासाठी ग्राहकांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. भारतात सुरुवातीला एक महिन्यासाठी ट्रायल मोफत उपलब्ध असेल.

ट्रायलनंतर ग्राहकांना ९९ रूपयांना सब्‍सस्क्रिप्शन मिळणार आहे. गुगल पे पास वर्षाला सबस्क्राईब करायचा असेल तर ८८९ रूपयांचा रिजार्ज करावा लागणार आहे. तर सबस्क्रिप्शन साठी दुसरा पर्याय म्हणून महिन्यासाठी ग्राहक १०९ रूपयांचा रिचार्ज करू शकतात.

गुगल प्ले पास सबस्क्रिप्शनचे काय होणार फायदे?

गुगल प्ले पासचा जास्त फायदा डेव्हलपर लोकांसाठी होईल. वापरकर्त्यांनाही याचा फायदा होईल आणि काही काळानंतर  ग्राहकांना याबाबत अधिक माहिती मिळेल. प्रत्येक महिन्यात गुगल ग्लोबल आणि लोकल डेव्हलपर यांना सोबत घेत नव्या गेम्स आणि ॲप्सचा यामध्‍ये समावेश करण्यात येईल.

Back to top button