IND vs SA Test : सिराज वादळासमोर द. आफ्रिकेचे लोटांगण, विकेटचा षटकार | पुढारी

IND vs SA Test : सिराज वादळासमोर द. आफ्रिकेचे लोटांगण, विकेटचा षटकार

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील मालिकेतील शेवटचा सामना आजपासून (दि.३) केपटाऊन येथे खेळवला जात आहे. सामन्यात दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. सेंच्युरियन कसोटीतील दारुण पराभवानंतर भारतीय संघाचे दक्षिण आफ्रिकेत मालिका जिंकण्याचे स्वप्न भंगले आहे. मात्र, केपटाऊनमध्ये होत असलेला दुसरा सामना जिंकून कसोटी मालिकेत टीम इंडियाला बरोबरी साधण्याची संधी आहे. (IND vs SA Test)

मालिकेतील पहिल्या सामन्यात विजय मिळवून दक्षिण आफ्रिकेने मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. कर्णधार रोहित शर्मा आणि यशस्वी जैस्वाल या सलामीच्या जोडीला दमदार सुरुवात करावी लागेल. गेल्या १२ वर्षांत या मैदानावर खेळल्या गेलेल्या तीन कसोटी सामन्यांमध्ये भारतीय सलामी जोडीने एकही शतकी भागीदारी केलेली नाही. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२५ च्या दृष्टीने आगामी काळातील सर्व कसोटी सामने जिंकणे टीम इंडियासाठी खूप गरजेचे आहेत. रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेत मालिका बरोबरीत सोडवण्यात यश मिळवतो का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. (IND vs SA Test)

अपडेट्स : 

दक्षिण आफ्रिकेला आठवा झटका

दक्षिण आफ्रिकेने 46 धावांत आठ विकेट गमावल्या आहेत. केशव महाराजला बाद करत मुकेश कुमारने भारताला आठवे यश मिळवून दिले. महाराजने 13 चेंडूत तीन धावा केल्या. जसप्रीत बुमराहने त्याचा झेल घेतला.   मुकेश कुमारची कसोटी कारकिर्दीतील ही पहिली विकेट आहे.

सिराज वादळासमोर द. आफ्रिकेचे लोटांगण, विकेटचा षटकार

मोहम्मद सिराजने काइल वेरेयनला बाद करून डावातील सहावे यश मिळवले. 18व्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर त्याने व्हेरेयनला शुभमन गिलकरवी झेलबाद केले. वेरेनने 30 चेंडूत 15 धावा केल्या. त्याने चौकार मारला.

सिराजने यानसेनला केले बाद

मोहम्मद सिराजने मार्को जॅनसेनला बाद करून भारताला सहावे यश मिळवून दिले. त्याने 16व्या षटकातील पाचव्या चेंडूवर यान्सेनला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. विकेटकिपर केएल राहुलने त्याचा झेल घेतला. यानसेनला खाते उघडता आले नाही.

दक्षिण आफ्रिकेचा निम्मा संघ तंबूत

दक्षिण आफ्रिकेला 35 धावांवर पाचवा धक्का बसला. मोहम्मद सिराजने 16व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर डेव्हिड बेडिंगहॅमला बाद केले. यशस्वी जैस्वालने त्याला स्लिपमध्ये झेलबाद केले. सिराजला चौथे यश मिळाले.

सिराजची तिसरी विकेट

मोहम्मद सिराजला तिसरे यश टोनी डी जॉर्जीच्या रूपाने मिळाले. 10व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर सिराजने जॉर्जीला यष्टिरक्षक केएल राहुलकडे झेलबाद केले.

दक्षिण आफ्रिकेला तिसरा धक्का

ट्रिस्टन स्टब्सच्या रूपाने दक्षिण आफ्रिकेला तिसरा धक्का बसला. स्टब्स 11 चेंडूत तीन धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. नवव्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर तो बाद झाला. जसप्रीत बुमराहला त्याच्या चेंडूवर रोहित शर्माने झेलबाद केले.

दक्षिण आफ्रिकेला दुसरा धक्का

मोहम्मद सिराजने भारताला मोठे यश मिळवून दिले. मागील सामन्यात शतक झळकावणाऱ्या डीन एल्गरला त्याने सहाव्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर क्लीन बोल्ड केले. एल्गरला 15 चेंडूत केवळ चार धावा करता आल्या.

दक्षिण आफ्रिकेला पहिला धक्का

दक्षिण आफ्रिकेला पहिला धक्का एडन मार्करामच्या रूपाने बसला. चौथ्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर तो बाद झाला. यशस्वी जैस्वालने मोहम्मद सिराजला स्लिपमध्ये झेलबाद केले. मार्करामने 10 चेंडूत दोन धावा केल्या.

संघ : 

भारत (प्लेइंग इलेव्हन) : रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (डब्ल्यू), रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसीद कृष्णा, मुकेश कुमार

दक्षिण आफ्रिका (प्लेइंग इलेव्हन) : डीन एल्गर (कर्णधार), एडन मार्कराम, टोनी डी झोर्झी, ट्रिस्टन स्टब्स, डेव्हिड बेडिंगहॅम, काइल वेरेन (डब्ल्यू), मार्को जॅनसेन, केशव महाराज, कागिसो रबाडा, नांद्रे बर्गर, लुंगी एनगिडी

हेही वाचा :

Back to top button