Ecuadorian beauty queen: इक्वेडोरच्या ब्युटी क्वीनची रेस्टॉरंटमध्ये गोळ्या झाडून हत्या | पुढारी

Ecuadorian beauty queen: इक्वेडोरच्या ब्युटी क्वीनची रेस्टॉरंटमध्ये गोळ्या झाडून हत्या

पुढारी ऑनलाईन डेस्क: इक्वेडोरची (दि.अमेरिका) ब्युटी क्वीन आणि सोशल मीडिया इंफ्लुएंसरची एका रेस्टॉरंटमध्ये गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. इक्वेडोरची (Ecuadorian beauty queen) ब्यूटी क्वीन पररागा गोयबुरो एका कुख्यात टोळीच्या नेत्यासोबत रिलेशनशिपमध्ये होती, असे वृत्तात म्हटले आहे.

माजी मिस इक्वाडोर स्पर्धक क्वीन पॅरागा गोयबुरो हिची भरदिवसा गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. २०२२ च्या मिस इक्वाडोर स्पर्धेत भाग घेणारी २३ वर्षीय क्वीन पॅरागा गोयबुरोची २८ एप्रिल रोजी क्वेवेडो शहरातील एका रेस्टॉरंटमध्ये तिची (Ecuadorian beauty queen) हत्या करण्यात आली होती. टेलिग्राफ वृत्तपत्राच्या रिपोर्टनुसार, ती एका लग्नात सहभागी होण्यासाठी शहरात आली होती. गोयाबुरोचे ड्रग स्मगलर लिआंद्रो नोरेरो याच्याशी प्रेमसंबंध असल्याचे सांगितले जाते, ज्याचा एक वर्षापूर्वी तुरुंगातील दंगलीत मृत्यू झाला होता.

गोयबुरोचे नाव भ्रष्टाचाराच्या चौकशीतही आले होते, ज्याने न्यायालयीन अधिकाऱ्यांना संघटित गुन्हेगारीशी जोडले होते, असे टेलिग्राफने वृत्त दिले आहे. तिच्या मृत्यूच्या काही मिनिटांपूर्वी, ब्यूटी क्वीनने रेस्टॉरंटमध्ये (Ecuadorian beauty queen) जेवतानाचा फोटो पोस्ट केला.

सीसीटीव्हीमध्ये कैद झालेल्या या घटनेत पीडिता एका व्यक्तीशी बोलत असताना रेस्टॉरंटजवळ येणा-या दोन बंदूकधाऱ्यांकडे पाहताना दिसत आहे. एक प्रवेशद्वाराजवळ उभा असताना, दुसरा बंदूकधारी तिच्या दिशेने धावला आणि त्याने गोयबुरो आणि ती ज्याच्याशी बोलत होती त्या दोघांवरही गोळीबार केला. त्यानंतर दोघेही घटनास्थळावरून पळून जाताना, सीसीटीव्हीत कैद झाले आहे.

Back to top button