CSK vs SRH : हैदराबादचे चेन्नईला १३५ धावांचे आव्हान | पुढारी

CSK vs SRH : हैदराबादचे चेन्नईला १३५ धावांचे आव्हान

पुढारी ऑनलाईन डेस्क :  सनरायझर्स हैदराबादने २० ओव्हरमध्ये सात गडी गमावून १३४ धावा करत चेन्नईसमोर १३५ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करणाऱ्या हैदराबादची सुरुवात खराब झाली. या सामन्यात मयंक अग्रवालच्या जागी अभिषेक शर्मा हॅरी ब्रूकसोबत सलामीला आला. (CSK vs SRH)

या मोसमातील पहिले शतक झळकावणारा हॅरी ब्रूक १८ धावा करून आकाश सिंगच्या हाती झेलबाद झाला. यानंतर अभिषेकने राहुल त्रिपाठीसोबत दुसऱ्या विकेटसाठी ३६ धावांची भागीदारी केली. जडेजाने स्टंपच्या रेषेत गोलंदाजी करत अभिषेकला आपल्या जाळ्यात अडकवले. (CSK vs SRH)

जडेजाने अभिषेकला अजिंक्य रहाणेकरवी झेलबाद केले. तो २६ बॉलमध्ये तीन चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ३४ धावा करून बाद झाला. यानंतर जडेजाने राहुल त्रिपाठीला आकाश सिंगकरवी झेलबाद केले. त्रिपाठीला २१ बॉलमध्ये २१ धावा करता आल्या.
यानंतर महिष तेक्षानाने कर्णधार एडन मार्करामला वॉक केले. तिक्षानाने मार्करामला यष्टिरक्षक धोनीकरवी झेलबाद केले. त्याला १२ चेंडूत १२ धावा करता आल्या. त्यानंतर जडेजाच्या फिरकीची जादू पाहायला मिळाली आणि सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या मयंक अग्रवालला धोनीने यष्टिचित केले. तो पुन्हा एकदा अपयशी ठरला आणि दोन धावा करू शकला.

संबंधित बातम्या

हेनरिक क्लासेन १६ बॉलमध्ये १७ धावा करून महिष पाथिरानाने बाद केले. मार्को जॉन्सनने २२ चेंडूत १७ धावा करून नाबाद राहिला. त्याचवेळी डावाच्या शेवटच्या बॉलमध्ये नऊ धावा काढून वॉशिंग्टन सुंदर धावबाद झाला. चेन्नईकडून जडेजाने सर्वाधिक तीन बळी घेतले. तर आकाश सिंग, तीक्षाना आणि पाथिराना यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

हेही वाचा;

Back to top button