WPL 2023 : मुंबईचे गुजरातला २०८ धावांचे आव्हान | पुढारी

WPL 2023 : मुंबईचे गुजरातला २०८ धावांचे आव्हान

पुढारी ऑनलाईन डेस्क : महिला प्रीमियर लीगच्या पहिल्याच सामन्यात मुंबई इंडियन्सने 200 धावांचा टप्पा पार केला. प्रथम फलंदाजी करताना त्यांनी 20 षटकांत 5 गडी गमावून 207 धावा केल्या. त्याच्याकडून कर्णधार हरमनप्रीत कौरने सर्वाधिक 65 धावा केल्या. तिने 30 चेंडूंच्या खेळीत 14 चौकार मारले. सलामीवीर हिली मॅथ्यूजने 31 चेंडूत 47 आणि अमेलिया केरने 24 चेंडूत नाबाद 45 धावा केल्या. नताली सीव्हरने 23 आणि पूजा वस्त्राकरने 15 धावांचे योगदान दिले. यास्तिका भाटिया एक धाव काढून बाद झाली. इसी वँगने एका चेंडूत सहा धावा केल्यानंतर नाबाद राहिला. गुजरात जायंट्सकडून स्नेह राणाने सर्वाधिक दोन बळी घेतले. ऍशले गार्डनर, तनुजा कंवर आणि जॉर्जिया वेरेहम यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली

संघ :

गुजरात जायंट्स : बेथ मोनी (कर्णधार), सबिनेनी मेघना, हरलीन देओल, अॅशले गार्डनर, अॅनाबेल सदरलँड, दयालन हेमलता, जॉर्जिया वेरेहम, स्नेह राणा, तनुजा कंवर, मोनिका पटेल, मानसी जोशी.

मुंबई इंडियन्स : हरमनप्रीत कौर (कर्णधार), यास्तिका भाटिया, नताली सिव्हर-ब्रुंट, हीली मॅथ्यूज, पूजा वस्त्राकर, इस्सी वोंग, हुमैरा काझी, अमेलिया केर, अमनजोत कौर, जिंतिमनी कलिता, सायका इशाक.

हेही वाचा;

Back to top button