कसबा म्हणजे देश जिंकल्याच्या अविर्भावात विरोधक वावरताहेत : चंद्रशेखर बावनकुळे | पुढारी

कसबा म्हणजे देश जिंकल्याच्या अविर्भावात विरोधक वावरताहेत : चंद्रशेखर बावनकुळे

नागपूर: पुढारी वृत्तसेवा : याचवेळी ही दोन पक्षांची नव्हे, तर दोन उमेदवारांची लढाई होती. धनगेकर यांना तिसऱ्यांदा लढत असल्याने जनतेत सहानुभूती मिळाली. रासने यांना ती मिळू शकली नाही. ते पहिल्यांदाच निवडणूक लढले, असेही बावनकुळे यांनी सांगितले.

खा. संजय राऊत यांनी आगामी निवडणुकीत 40 लोकसभा तर 200 विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीला यश मिळेल, असा दावा केला, या संदर्भात छेडले असता बावनकुळे म्हणाले की, ज्यांना चाळीस वर्षांचे शिवसैनिक जपता आले नाहीत. ते कुठून उमेदवार आणणार आहेत. विधिमंडळाला चोरमंडळ संबोधण्याची ही कुठली भाषा, हे कुठली संस्कार आहेत असा सवाल त्यांनी केला.

आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आणि शिंदे, फडणवीस सरकारच्या कामाच्या बळावर निवडणुका लढू आणि जिंकू. कसबा निवडणुकीवरून ब्राह्मण समाजाला बदनाम करण्याचे प्रयत्न होत असले तरी ब्राह्मण समाज देश, देव आणि धर्म या विरोधात कधीही मतदान करत नाही. कांदा, भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सरकार तत्पर असून विरोधकांना राजकारण करण्यातच अधिक रस असल्याची टीका त्यांनी केली. वीज दरवाढीच्या संदर्भात जनसुनावणीत आक्षेप नेहमीच नोंदवले जातात. राज्य सरकार व राज्य वीज नियामक आयोग निश्चितच जनतेला दिलासा देण्याच्या दृष्टीने समन्वयातून योग्य तो निर्णय घेतील, असा विश्वास बावनकुळे यांनी व्यक्त केला.

हेही वाचा 

Back to top button