सुंदरला धावबाद करण्यात माझी चूक : सूर्यकुमार | पुढारी

सुंदरला धावबाद करण्यात माझी चूक : सूर्यकुमार

दुसर्‍या टी-20 सामन्यात सूर्यकुमार यादव आणि वॉशिंग्टन सुंदर यांची भागीदारी फुलत चालली असताना सुंदर धावचित झाला. वास्तविक सूर्यासाठी सुंदरने आपली विकेट फेकली, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. सामनावीरचा पुरस्कार स्वीकारल्यानंतर सूर्यकुमार यादव म्हणाला, जेव्हा मी फलंदाजीसाठी बाहेर पडलो, तेव्हा परिस्थितीशी जुळवून घेणे खूप महत्त्वाचे होते.

वॉशिंग्टन बाद झाल्यानंतर कोणत्याही एका फलंदाजाने शेवटपर्यंत खेळत राहणे महत्त्वाचे होते. वॉशिंग्टन सुंदर धावबाद झाला, तेव्हा ती माझी चूक होती. साहजिकच तिथे एकही धाव नव्हती, मी चेंडू कुठे जात आहे हे पाहिले नव्हते.

सूर्यकुमार पुढे म्हणाला, ही एक आव्हानात्मक विकेट होती. आम्हाला दुसर्‍या डावात अशा प्रकारच्या वळणाची अपेक्षा नव्हती, पण जुळवून घेणे महत्त्वाचे होते. आम्हाला त्या षटकात फक्त एका फटक्याची गरज होती आणि आमचा संयम खूप महत्त्वाचा होता. विजयी धावा घेण्यापूर्वी, तो (हार्दिक) आला आणि मला म्हणाला ‘तू या चेंडूवर विजयी धाव घेणार आहेस’ आणि त्यामुळे मला खूप आत्मविश्वास मिळाला.

Kolhapur Football : हुल्लडबाजांमुळे कोल्हापूरच्या फुटबॉलला गालबोट!

ऋषभ पंत याला लवकरच डिस्चार्ज

Back to top button