मार्कस स्टॉयनिस भारत दौर्‍याला मुकण्याची शक्यता | पुढारी

मार्कस स्टॉयनिस भारत दौर्‍याला मुकण्याची शक्यता

सिडनी : ऑस्ट्रेलियाचा स्टार अष्टपैलू मार्कस स्टॉयनिस न्यूझीलंडविरुद्धच्या तिसर्‍या आणि शेवटच्या एकदिवसीय सामन्यातून बाहेर झाला आहे. जर स्टॉयनिस वेळेत तंदुरुस्त झाला नाही तर तो भारताविरुद्धच्या टी-20 मालिकेतूनही बाहेर जाऊ शकतो. भारत दौर्‍यापूर्वी ऑस्ट्रेलियन संघासाठी हा मोठा धक्का असेल. कारण डेव्हिड वॉर्नरला भारत दौर्‍यातून विश्रांती देण्यात आली आहे.

न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतील दुसर्‍या सामन्यात मार्कस स्टॉयनिसने फक्त सहा चेंडू खेळले. दुसर्‍या एकदिवसीय सामन्यात फक्त तीन ओव्हर टाकल्या. ऑस्ट्रेलियाने हा सामना 113 धावांनी जिंकला. न्यूझीलंडच्या डावाच्या 23 व्या षटकात जिमी नीशामची विकेट घेतल्यानंतर स्टॉयनिसने स्नायूंच्या दुखापतीमुळे मैदान सोडले आणि तो मैदानात परतला नाही. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने सांगितले की, स्टॉयनिस पर्थमध्ये त्याच्या फिटनेसवर काम करत आहे. त्यानंतर ऑस्ट्रेलियाला 21 ते 26 सप्टेंबर दरम्यान तीन टी-20 सामन्यांसाठी भारत दौर्‍यावर जायचे आहे. या मालिकेपूर्वी स्टॉयनिसला तंदुरुस्त होण्यासाठी एक आठवडा आहे.

  • Asia Cup 2022 : ही दोस्ती तुटायची नाय… भारतीय-अफगाणी प्रेक्षकांचा दोस्ताना
  • Urvashi Rautela : उर्वशी रौतेलाबाबत पाकिस्तानी क्रिकेटरने केला गौप्यस्फोट; त्यानं जाहीर केलं की…

 

Back to top button