टेबल टेनिस : शरथ-साथियान जोडीला रौप्यपदक | पुढारी

टेबल टेनिस : शरथ-साथियान जोडीला रौप्यपदक

टेबल टेनिसमध्ये अचंता शरथ कमल आणि जी साथियान यांनी रविवारी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पुरुष दुहेरीत रौप्यपदक मिळविले. अंतिम फेरीत या जोडीला इंग्लंडच्या पॉल ड्रिकहॉल आणि लियाम पिचफोर्ड या जोडीने त्यांना 11-8, 8-11, 3-11, 11-7, 4-11 ने पराभूत केले.

इंग्लंडची जोडी आपले विजेतेपद राखण्यात यशस्वी ठरली आहे. इंग्लंडच्या पॉल ड्रिंकहॉल व लिएम पिचफोर्ड यांनी भारतीय जोडीला कडवी टक्‍कर दिली. भारतीय जोडीने पहिला गेम जिंकला; परंतु इंग्लंडच्या खेळाडूंनी पुढील दोन गेम जिंकून सामन्यात 2-1 अशी आघाडी घेतली.

चौथा गेम निर्णायक होता, त्यात भारतीय जोडीने 11-7 असा जिंकून 2-2 अशी बरोबरी केली. इंग्लंडच्या खेळाडूंनी 8-4 अशी आघाडी घेतली. इंग्लंडच्या जोडीने 11-4 असा विजय मिळवून सुवर्णपदक नावावर केले. भारतीय जोडीला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.

Back to top button