… आणि स्टार्कच्या बायकोने कपाळावर हात मारून घेतला  | पुढारी

... आणि स्टार्कच्या बायकोने कपाळावर हात मारून घेतला 

बेंगळुरु : पुढारी ऑनलाईन 

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातीत तिसऱ्या सामन्यात भारताने कांगारुंना ७ विकेट्सनी मात देत मालिका २-१ अशी जिंकली. तिसऱ्या सामन्यात भारतीय गोलंदाजांवर दबाव आणण्यासाठी कर्णधार अॅरोन फिंचने एक स्ट्रॅटेजी अवलंबली होती. पण, त्या स्ट्रॅटेजीचा काही फायदा झाला नाही. त्याच स्ट्रॅटेजीचा भाग असलेल्या मिशेल स्टार्कच्या पत्नीने ती स्ट्रॅटेजी फेल गेल्यानंतर एक जबरदस्त प्रतिक्रिया दिली. ही प्रतिक्रिया सध्या चांगलीच व्हायरल होत आहे. काहींच्या मते अशी प्रतिक्रिया फक्त पत्नीच देऊ शकते. 

अॅरोन फिंचने जडेजाच्या गोलंदाजीवर मार्नस लॅबुश्चग्नेला बाद केल्यानंतर जडेजाला विरुद्ध आक्रमक डावखुरा फलंदाज पाठवण्याची स्ट्रॅटेजी आखली. त्याने मिशेल स्टार्कवर ही जबाबदारी टाकली. पण, जडेजाच्याच गोलंदाजीवर अवघ्या तिसऱ्या चेंडूवर स्टार्क भोपळाही न फोडता माघारी परतला. त्यामुळे फिंचची स्ट्रॅटेजी फेल गेली. पण, याच्यावर स्टार्कची पत्नी अॅलयसा हेली जी स्वतः ऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेट संघाकडून खेळते अशी काही प्रतिक्रिया दिली की नेटकऱ्यांना हसू आवरेना. 

हेलीने आपल्या पतीचा स्टार्कच्या शून्यावर बाद झालेला ट्विटवर प्रतिक्रिया देताना कपाळावर हात मारलेल्या मुलीचा इमोजी शेअर केला. यावरुन नेटकऱ्यांनी स्टार्कची चांगलीच खेचली. 

Back to top button