IPL वेळापत्रक जाहीर; ‘यांच्यात’ रंगणार पहिला महामुकाबला | पुढारी

IPL वेळापत्रक जाहीर; 'यांच्यात' रंगणार पहिला महामुकाबला

इंडियन प्रीमियर लीगच्या १३ व्या आवृत्तीचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. आयपीएल २०२० ची सुरुवात १९ सप्टेंबरपासून होणार आहे आणि चाहत्यांना आतुरतेने वेळापत्रकाची उत्सुकता लागून राहिली होती. १९ सप्टेंबर सायंकाळी साडे सात वाजता सलामीची पहिली लढत मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्जमध्ये होणार आहे. 

अधिक वाचा : डोळे दान करून जडेजाच्या पत्नीने साजरा केला वाढदिवस!

आयपीएल २०२० संयुक्त अरब अमिरातीमध्ये १९ सप्टेंबर ते ८ नोव्हेंबर दरम्यान होणार आहे. ऑक्टोबर- नोव्हेंबर २०२० मध्ये ऑस्ट्रेलियामध्ये होणारा टी-२० विश्वचषक पुढे ढकलण्याच्या आयसीसीच्या निर्णयानंतर आयपीएल शक्य झाले आहे. कोरोना विषाणूच्या साथीमुळे आयपीएल आयोजित करण्यात भारताने असमर्थता व्यक्त केली होती.

अधिक वाचा : ‘बायो सिक्युर बबल’मधील आयपीएल

काही दिवसांपूर्वी चेन्नई सुपर किंग्जच्या वेगवान गोलंदाजांसह दुबईत कोरोना टेस्टमध्ये पॉझिटिव्ह आले आहेत. इंडियन एक्स्प्रेसच्या अहवालानुसार संघातील खेळाडू, पथक सदस्य आणि सहाय्यक कर्मचार्‍यांची कोरोना विषाणू चाचणी घेण्यात आली असून त्यातील काही निकाल पॉझिटिव्ह आले आहेत.  त्यामध्ये काही नेटमधील गोलंदाज, काही सोशल मीडिया टीमचे सदस्य आणि शॉर्ट फॉरमॅटमध्ये खेळणारा भारतीय वेगवान गोलंदाज यांचा समावेश आहे.

अधिक वाचा : ‘बायो सिक्युर’ आयपीएल ( पार्ट 2 )

आयपीएलच्या आगामी हंगामासाठी ड्रीम ११ हा अधिकृत प्रायोजक असेल. चिनी मोबाईल ब्रँड विव्हो आयपीएलचा मागील प्रायोजक होता, पण भारत आणि चीनमधील वाढता तणाव लक्षात घेता बीसीसीआयने हा करार स्थगित केला. वृत्तानुसार, बीसीसीआयला विव्होकडून ४४० कोटी रुपये मिळाले होते. ड्रीम ११ ला २२२ कोटी रुपये मंडळाला द्यावे लागतील. 

अधिक वाचा : IPL Flash Black : डेक्‍कन चार्जर्सने गाजवला दुसरा हंगाम

Back to top button