किंग्स इलेव्हन पंजाबपुढे दिल्ली कॅपिटल्सचे आव्हान | पुढारी

किंग्स इलेव्हन पंजाबपुढे दिल्ली कॅपिटल्सचे आव्हान

दुबई : वृत्तसंस्था

रवीचंद्रन अश्विन, अमित मिश्रा आणि अक्षर पटेलसारख्या अनुभवी फिरकी गोलंदाजांच्या उपस्थितीमुळे दिल्ली कॅपिटल्स संघाचा इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) स्पर्धेत रविवारी खेळविण्यात येणार्‍या किंग्स इलेव्हन पंजाब संघाविरुद्धच्या सामन्यात पारडे जड असणार आहे. दोन्ही संघांचा सत्रातील पहिला सामना असणार आहे.

किंग्स इलेव्हन पंजाब संघाचा कर्णधार लोकेश राहुल आणि दिल्ली कॅपिटल्स संघाचा कर्णधार श्रेयस अय्यर यांच्याकडे भविष्यातील भारतीय कर्णधार म्हणून पाहिले जात आहे. दोन्ही संघांतील प्रशिक्षक हे जागतिक दर्जाचे खेळाडू आहेत. त्यामुळे या सामन्यात रणनीती काय असेल, हे पाहणे उत्सुकतेचे असणार आहे. पंजाबचे खेळाडू अनिल कुंबळेकडून प्रेरणा घेतील, तर दिल्लीचे खेळाडू पाँटिंगच्या योजनांच्या मदतीने मैदानावर चमक दाखवण्यास सज्ज असतील.

दोन्ही संघांत मोठे फटके मारणार्‍या खेळाडूंची कमतरता नाही; पण यूएईच्या धिम्या खेळपट्ट्यांवर अश्विन, मिश्रा आणि अक्षर पटेल यांचा मारा पंजाबवर भारी पडू शकतो. दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये होणार्‍या या सामन्यात फलंदाजीत दिल्लीकडे चांगले खेळाडू आहेत, ज्यामध्ये पृथ्वी शॉ, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, शिखर धवन शिवाय वेस्ट इंडिजच्या शिमरोन हेटमायरचादेखील समावेश आहे. किंग्स इलेव्हन पंजाबकडे ख्रिस गेल, केएल राहुल, ग्लेन मॅक्सवेलसारखे फलंदाज आहेत. इंग्लंडविरुद्ध शेवटच्या एकदिवसीय सामन्यात शतकी खेळी खेळलेल्या मॅक्सवेलचा आत्मविश्वास दुणावला असेल. यासोबत पंजाबकडे राहुल आणि गेल यांच्या रूपात आक्रमक सलामी जोडी आहे. ज्यानंतर मयांक अग्रवालचा क्रमांक येतो. दिल्लीचा संघ कगिसो रबाडासह बिग बॅश लीगमध्ये सर्वाधिक विकेटस् घेणार्‍या डॅनियल सॅम्सला संघात स्थान देऊ शकते.

दोन्ही संघ पुढीलप्रमाणे : 

दिल्ली कॅपिटल्स : श्रेयस अय्यर (कर्णधार), रविचंद्रन अश्विन, शिखर धवन, पृथ्वी शॉ, शिमरोन हेटमायर, कगिसो रबाडा, अजिंक्य रहाणे, अमित मिश्रा, ऋषभ पंत (विकेटकीपर), इशांत शर्मा, अक्षर पटेल, संदीप लामिचाने, कीमो पॉल,  डॅनियल सॅम्स , मोहित शर्मा, एनरिच नोर्जे, एलेक्स  कॅरी (विकेटकीपर), आवेश खान, तुषार देशपांडे, हर्षल पटेल, मार्कस स्टोइनिस, ललित यादव

किंग्स इलेव्हन पंजाब :  लोकेश राहुल (कर्णधार), मयंक अग्रवाल, शेल्डन कॉटरेल, ख्रिस गेल, ग्लेन मॅक्सवेल, मोहम्मद शमी, मुजीब उर रहमान, करुण नायर, जेम्स नीशम, निकोलस पूरन (विकेटकीपर), इशान पोरेल, अर्शदीप सिंह, मुरुगन अश्विन, कृष्णप्पा गौतम, हरप्रीत बरार, दीपक हुड्डा, ख्रिस जॉर्डन, सरफराज खान, मनदीप सिंह, दर्शन नलकंडे, रवी बिश्नोई, सिमरन सिंह (विकेटकीपर), जगदीशन सुचित, तजिंदर सिंह, हार्डस विलजोन

Back to top button