CSKvsDC : दिल्ली चेन्नईवर भारी, सलग दुसरा विजय साजरा | पुढारी

CSKvsDC : दिल्ली चेन्नईवर भारी, सलग दुसरा विजय साजरा

दुबई : पुढारी ऑनलाईन 

दिल्ली कॅपिटल्सने फलंदाजीबरोबच गोलंदाजीतही दमदार कामगिरी करत चेन्नईचा ४४ धावांनी पराभव करत यंदाच्या आयपीएलमधील आपला सलग दुसरा विजय साजरा केला. दिल्लीकडून रबाडाने ३ तर नॉर्टजेने दोन विकेट घेतल्या. चेन्नईकडून फाफ डुप्लेसीने एकाकी झुंज देत ३५ चेंडूत ४३ धावांची खेळी केली. तत्पूर्वी पृथ्वी शॉ ( ६४ ) आणि शिखर धवन ( ३५ ) यानी दिलेल्या ९४ धावांच्या सालामीच्या जोरावर चेन्नईसमोर १७६ धावांचे टार्गेट ठेवले होते. 

दिल्ली कॅपिटल्सने ठेवलेल्या १७६ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईने आपली पहिली विकेट स्वस्तात गमावली. धडाकेबाज सलामीवीर शेन वॉट्सनला अक्षर पटेलने १४ धावांवर बाद करत सीएसकेला पहिली धक्का दिला. त्यांनंतर दिल्लीच्या गोलंदाजांनी टिच्चून मारा करत चेन्नईच्या धावगतील ब्रेक लागला. याच दबावात सलामीवीर मुरली विजय नॉर्टजेच्या गोलंदाजीवर बाद झाला. पाठोपाठ ऋतुराज गायगवाड धावबाद झाला. त्यामुळे चेन्नईची अवस्था ९ षटकात ३ बाद ४४ धावा अशी झाली होती. 

यानंतर फाफ डुप्लेसीने चेन्नईचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. त्याने केदार जाधवच्या जोडीने चौथ्या विकेटसाठी ५४ धावांची भागिदारी रचली पण, नॉर्टजेने २६ धावांवर खेळणाऱ्या केदार जाधवला बाद करत ही जोडी फोडली. आता फाफ डुप्लेसीच्या जोडीला कर्णधार महेंद्र सिंह धोनी आला होता. पण सीएसकेला २६ चेंडूत ७८ धावांची गरज होती.डुप्लेसी आणि धोनीने आक्रमक फलंदाजी करण्याचा प्रयत्न केला पण, रबाडाने ४३ धावांवर खेळणाऱ्या डुप्लेसीला बाद करुन मोठा धक्का दिला. या धक्यातून सीएसके अखेरपर्यंत सावरली नाही. त्यांना २० षटकात ७ बाद १३१  धावांपर्यंतच मजल मारता आली. 

तत्पूर्वी, आयपीएल २०२० मध्ये आज चेन्नई सुपर किंग्जनने नाणफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या दिल्ली कॅपिटल्सने पहिल्या पॉवर प्लेमध्ये सावध खेळ करत जम बसवण्याचा प्रयत्न केला. दोन चौकारांच्या सहाय्याने सलामीवीर पृथ्वी शॉने दमदार सुरुवात केली. दरम्यान, दुसरा सलामीवीर शिखर धवन पॉवर प्लेमध्ये सावधच फलंदाजी करत होता. पण, या दोघांनी पॉवर प्ले संंपल्यानंतर आपला गिअर बदलत झपाट्य़ाने धावा करण्यास सुरुवात केली. 

दरम्यान, पृथ्वी शॉ आपले या हंगामातील पहिले अर्धशतक ३५ चेंडूत पूर्ण केले. शॉ आणि धननने दिल्लीली १० षटकात ८८ धावांपर्यंत पोहचवले. ही जोडी दिल्लीसाठी शतकी सलामी देणार असे वाटत असताना पियुष चावलाने ३५ धावांवर खेळणाऱ्या शिखर धवनला पायचीत बाद केले. त्यानंतर पृथ्वी शॉने ऋषभ पंतच्या साथीने दिल्लीचा डाव पुढे नेण्याचा प्रयत्न केला पण. चावलाच्या एका चेंडूवर पुढे सरसावून फटका लगावण्याच्या नादात तो स्टम्पिंग झाला. त्याने ४३ चेंडूत ६४ धावांची आक्रमक खेळी केली. 

पृथ्वी बाद झाला त्यावेळी दिल्लीच्या १२ षटकात १०३ धावा झाल्या होत्या. त्यानतंर ऋषभ पंत आणि श्रेयस अय्यरने दिल्लीचा डाव पुढे नेला. दोघांनी अर्धशतकी भागिदारी रचत १८ व्या षटकात १५७ धावांपर्यंत मजल मारली. पण, अखेरच्या दोन षटकात दिल्लीची धावगती थोडीशी मंदावली. त्यातच कर्णधार श्रेयस अय्यर २६ धावांवर बाद झाला. जोस हेजलवूडने टाकलेल्या अखेरच्या षटकात पंत आणि स्टॉयनिसने १४ धावा करत दिल्लीला १७५ धावांपर्यंत पोहचवले. ऋषभ पंतने २५ चेंडूत नाबाद ३७ धावांची खेळी केली.

Back to top button