महेंद्रसिंग धोनी निवडणुकीच्या रिंगणात? | पुढारी

महेंद्रसिंग धोनी निवडणुकीच्या रिंगणात?

मुंबई ; वृत्तसंस्था : आयपीएलच्या महाकुंभातून बाहेर पडताच चेन्नईचा थाला म्हणजेच कर्णधार महेंद्रसिंग धोनी निवडणुकीच्या रिंगणात उतरला असल्याचे पाहायला मिळाले. मात्र, नंतर असे स्पष्ट झाले की, संबंधित व्यक्ती धोनीसारखीच दिसते, वास्तवात ती व्यक्ती म्हणजे धोनी नव्हे.

माही मूळचा रांचीचा आहे. सध्या झारखंडमध्ये पंचायत समितीची निवडणूक सुरू आहे. अशातच तेथे धोनी दिसला. त्यामुळे तो निवडणुकीच्या रिंगणात उतरला असल्याची चर्चा क्रिकेटजगतात रंगली आहे. धोनीचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर एक फोटो सध्या व्हायरल होताना दिसत आहे. हा फोटो झारखंड पंचायत निवडणुकीतील आहे. रांची येथे इलेक्शन ड्युटीमध्ये धोनीसारखीच एक व्यक्ती पाहायला मिळाली. त्यामुळे सर्वांनाच असे वाटले की, महेंद्रसिंग धोनी इलेक्शन ड्युटी करत आहे.

आता याबाबतची वस्तुस्थिती समोर आली आहे. संबंधित व्यक्तीचे नाव विवेक कुमार असे आहे. ते या निवडणुकीत मतमोजणीच्या कामात व्यस्त आहेत. तथापि, त्यांचा चेहरा धोनीशी मिळता-जुळता असल्यामुळे लोकांना असे वाटले की, तो धोनीच आहे.

Back to top button