भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया पहिला कसोटी सामना होणार रद्द? | पुढारी

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया पहिला कसोटी सामना होणार रद्द?

सीडनी : पुढारी ऑनलाईन 

ॲडिलेडसह दक्षिण ऑस्ट्रेलियात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भावाच्या पुन्हा वाढत असल्यामुळे प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. दरम्यान, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियादरम्यान ॲडिलेड येथे १७ डिसेंबर रोजी पहिला कसोटी सामना खेळवला जाणार आहे, तरी या सामन्यावर कोरोनाचे सावट असून सामना रद्द होणार का असा प्रश्न क्रिकेटच्या चाहत्यांना सतावत आहे. 

टीम इंडिया ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी, एकदिवसीय आणि टी-२० क्रिकेट मालिका खेळणार आहे. भारत ऑस्ट्रेलिया दौऱ्यात चार टेस्ट मॅच, तीन वन डे मॅच आणि तीन टी ट्वेंटी मॅच खेळणार आहे. हा जवळपास दोन महिन्यांचा दौरा आहे. खेळाडू, प्रशिक्षक, वैद्यकीय कर्मचारी आणि सहाय्यक अशी जवळपास ५० जणांची भारतीय टीम आयपीएल संपल्यानंतर संयुक्त अरब आमिराती येथून एकाच विमानातून ऑस्ट्रेलियाला रवाना झाले. उभय देशांमधील पहिली वन डे २७ नोव्हेंबर रोजी सिडनी येथे खेळवली जाणार आहे. या सामन्यापासूनच भारताच्या ऑस्ट्रेलियाच्या दौ-या सुरुवात होणार आहे. भारताची टीम ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी सर्वात आधी सिडनीत पोहोचली. सिडनीत खेळाडू क्वारंटाइन राहिले आहेत. क्वारंटाइनची मुदत संपल्यानंतर खेळाडूंनी सराव सुरू करतील. 

भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा (२०२०-२१)

वन डे

पहिली वन डे – २७ नोव्हेंबर, सिडनी

दुसरी वन डे – २९ नोव्हेंबर, सिडनी

तिसरी वन डे – १ डिसेंबर, कॅनबेरा

टी 20

पहिली टी ट्वेंटी – ४ डिसेंबर, कॅनबेरा

दुसरी टी ट्वेंटी – ६ डिसेंबर, सिडनी

तिसरी टी ट्वेंटी – ८ डिसेंबर, सिडनी

टेस्ट

पहिली टेस्ट – १७ ते २१ डिसेंबर (डे नाईट, पिंक बॉल मॅच)

दुसरी टेस्ट – २६ ते ३० डिसेंबर

तिसरी टेस्ट – ७ ते ११ जानेवारी

चौथी टेस्ट – १५ ते १९ जानेवारी

Back to top button