डॉमनिक थिएम पहिल्या फेरीत गारद | पुढारी

डॉमनिक थिएम पहिल्या फेरीत गारद

पॅरिस : वृत्तसंस्था

फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेत अमेरिकन ओपन चॅम्पियन डॉमनिक थिएमला पुरुष एकेरीत पराभवाचा सामना करावा लागला. फ्रेंच ओपन स्पर्धेतील दोन वेळचा उपविजेता राहिलेल्या पाबलो अंदुजारकडून चुरशीच्या झालेल्या लढतीत त्याला 4-6, 5-7, 6-3, 6-4, 6-4 असे पराभूत व्हावे लागले. थिएमने सामन्याची चांगली सुरुवात करीत आघाडी घेतली; पण प्रतिस्पर्धी खेळाडूने जोरदार खेळ करीत सामन्यात वर्चस्व प्रस्थापित केले आणि थिएमला पुनरागमन करण्याची कोणतीच संधी दिली नाही.

महिला गटातील सामन्यात ऑस्ट्रेलियन ओपन 2019 ची उपांत्य फेरी गाठणार्‍या डॅनियल कोलिन्सने वांग शियूला 6-2, 4-6, 6-4 असे पराभूत केले. पुरुष गटात 12 व्या मानांकित पाबलो कारेनो बुस्टाने नॉर्बर्ट गोंबोसला 6-3, 6-4, 6-3 असे पराभूत करीत आगेकूच केली. तर, फॅबियो फोगनिनीने फ्रेंच वाईल्डकार्डधारक ग्रेगोईरे बैरेरेला 6-4, 6-1,6-4 असे पराभूत करीत पुढच्या फेरीत प्रवेश मिळवला. 

नाओमी ओसाकाने विजय मिळवल्यानंतर ती पत्रकार परिषदेत न आल्याने तिच्यावर 15 हजार डॉलरचा दंड आकारण्यात आला आणि पुढे असे केल्यास कठोर शिक्षेची चेतावनीदेखील दिली आहे. दंडाची रक्कम तिच्या पुरस्कार राशीतून कापण्यात येणार आहे. 

 

Back to top button