Fast Bowlers : कोण आहेत जगातील ‘टॉप’ पाच वेगवान गोलंदाज? | पुढारी

Fast Bowlers : कोण आहेत जगातील ‘टॉप’ पाच वेगवान गोलंदाज?

पुढारी ऑनलाईन डेस्क : सध्याच्या घडीला क्रिकेट हा फलंदाजांचा खेळ मानला जातो. शॉर्ट बॉउंडरी, मजबूत असलेल्या बॅट्स यांमुळे फलंदाजांसाठी क्रिकेट सोपे झाले आहे. पण याअगोदर अनेक गोलंदाजांनी क्रिकेट विश्वात आपले स्थान निर्माण केले आहे. वेगवान गोलंदाजी, स्विंग आणि बाऊंसरच्या जोरावर या वेगवान गोलंदाजांनी क्रिकेटच्या इतिहासात आपली छाप सोडली होती. (Fast Bowlers)

कोण आहेत जगातील सर्वांत वेगवान गोलंदाज पाहूयात….

१. शोएब अख्तर

जगातील सर्वांत वेगवान गोलंदाज शोएब अख्तर हा रावळपिंडी एक्सप्रेस म्हणूनही ओळखला जातो. २००३ साली शोएब अख्तरने सर्वांत वेगवान गोलंदाजी केली होती. त्याने १६१.३ च्या स्पीडने गोलंदाजी केली होती. शोएब अख्तरने टेस्ट क्रिकेटमध्ये १७८ तर एकदिवसीय सामन्यांत २४७ विकेट्स पटकावल्या आहेत. (Fast Bowlers)

२. ब्रेट ली

ब्रेट ली हा जगातील दुस-या क्रमांकाचा वेगवान गोलंदाज आहे. शेन वॉर्न, ग्लेन मॅग्रा यांच्यासोबत गोलंदाजी करणारा ब्रेट ली हा ऑस्ट्रेलियाच्या महान गोलंदाजांपैकी एक आहे. ब्रेट ली हा २००३ आणि २००७ च्या वर्ल्डकप जिंकलेल्या संघाचा भाग होता. ब्रेट लीने आंतरराष्ट्रीय टी २० सामन्यांत पहिल्यांदा हॅट्ट्रीक पटकावली होती. त्याने न्यूझीलंड विरूद्धच्या सामन्यात १६१.१ च्या स्पीडने गोलंदाजी केली होती. (Fast Bowlers)

३. शॉन टेट

२०१० च्या दरम्यान शॉन टेटची सर्वांत वेगवान गोलंदाज अशी ओळख होती. शॉन टेटने फक्त ३ कसोटी सामने आणि ३५ एकदिवसीय सामने खेळले आहेत. त्याने इंग्लंड विरूद्धच्या सामन्यात १६१.१ च्या स्पीडने गोलंदाजी केली होती. (Fast Bowlers)

४. जॉफ्री थॉमसन

जॉफ्री थॉमसनने १९७५ मध्ये पर्थच्या मैदानावर वेस्टइंडीज विरूद्धच्या सामन्यात १६०.६ च्या स्पीडने गोलंदाजी केली होती. १९७५ ते १९८५ दरम्यानच्या करियरमध्ये त्याने टेस्ट क्रिकेटमध्ये २०० विकेट्स पटकावल्या. तर एकदिवसीय सामन्यात त्याने ५५ विकेट्स पटकावल्या आहेत. (Fast Bowlers)

५. मिचेल स्टार्क

२०१५ च्या वर्ल्डकपमध्ये ऑस्ट्रेलियाकडून सर्वाधिक विकेट्स मिचेल स्टार्कने पटकावल्या होत्या. त्याने पटकावलेल्या विकेट्सच्या जोरावरच २०१५ च्या वर्ल्डकप ऑस्ट्रेलियाने आपल्या नावावर केला होता. पर्थच्या मैदानावर न्युझीलंड विरूद्धच्या कसोटी सामन्यात १६०.४ च्या स्पीडने गोलंदाजी केली होती. (Fast Bowlers)

हेही वाचलतं का?

Back to top button