IPL 2022 : दीपक चहर बाहेर पडल्याने त्याचे १४ कोटी बुडाले | पुढारी

IPL 2022 : दीपक चहर बाहेर पडल्याने त्याचे १४ कोटी बुडाले

मुंबई; पुढारी ऑनलाईन : चेन्नई सुपर किंग्जचा (CSK) वेगवान गोलंदाज दीपक चहर (deepak chahar) याला दुखापतीमुळे आयपीएलमधून (IPL 2022) बाहेर पडावे लागले आहे. यामुळे त्याला मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागणार आहे. दुखापतीमुळे संपूर्ण आयपीएलचा हंगामातूनच दीपक चहरला वगळण्यात आले आहे. आयपीएलच्या नियमांनुसार दीपकला त्याच्या फ्रँचायझींकडून आता एकही पैसा मिळणार नाही. दीपकचे झालेले नुकसान पाहूण सर्वत्र आयपीएलमध्ये खेळाडूंना कसे पैसे मिळतात याची पुन्हा एकदा चर्चा सुरु झाली आहे. चला तर मग जाणून घेऊया आयपीएलमध्ये खेळाडूंना मानधन कसे दिले जाते.

१. खेळाडूच्या (IPL 2022) लिलावाच्या रकमेला त्याचे मानधन म्हणतात. त्यानुसार करही कापला जातो. अन्य कोणतीही व्यक्ती खेळाडूच्या मानधनावर दावा करू शकत नाही. ही संपूर्ण रक्कम खेळाडूच्या खात्यात जाते.

२. लिलावाची (IPL 2022) रक्कम एका वर्षासाठीची असते. उदाहरणार्थ, जर एखाद्या खेळाडूला १४ कोटींमध्ये खरेदी केले असेल, तर त्याला दरवर्षी ही रक्कम दिली जाईल. त्याला तीन वर्षांसाठी ४२ कोटी रुपये दिले जातात.

३. २००८ साली (IPL 2022) खेळाडूंचा पगार अमेरिकन डॉलरमध्ये दिला जात होता. त्यावेळी प्रति डॉलर किंमत सुमारे ४० रुपये होती. २०१२ मध्ये डॉलर प्रणाली भारतीय रुपयामध्ये रूपांतरित झाली.

४. जर एखादा खेळाडू संपूर्ण हंगामासाठी उपलब्ध राहिला तर त्याला संपूर्ण रक्कम दिली जाते. तो किती सामने खेळतो याने काही फरक पडत नाही. २०१३ मध्ये ग्लेन मॅक्सवेलला मुंबईने ६ कोटी रुपयांना विकत घेतले होते. त्यानंतर मॅक्सवेल फक्त ३ सामने खेळला, पण त्याला मानधनाची पूर्ण रक्कम मिळाली.

५. हंगाम सुरू होण्यापूर्वी खेळाडू जखमी झाल्यास, फ्रेंचायझी त्याला कोणतीही रक्कम देत नाहीत. हंगामातील ठराविक सामन्यांसाठी खेळाडू उपलब्ध असल्यास, सामान्यतः एकूण रकमेच्या दहा टक्के रक्कम खेळाडूला दिली जाते.

६. जर एखाद्या खेळाडूने सांघिक शिबिरात तक्रार नोंदवली आणि हंगामापूर्वी दुखापत झाली आणि पुढील कोणत्याही सामन्यात भाग घेतला नाही, तर तो लिलावाच्या ५० टक्के रकमेचा हक्कदार आहे. यापूर्वी मोहम्मद शमी, ड्वेन ब्राव्हो यांना फायदा झाला आहे.

७. स्पर्धेदरम्यान एखादा खेळाडू जखमी झाल्यास त्याच्या उपचाराचा खर्च फ्रँचायझी उचलते.

८. कोणतीही फ्रँचायझी खेळाडूला एकाच वेळी पैसे देत नाही. संघाकडे किती रोख रक्कम आहे आणि प्रायोजकांकडून किती पैसे येतात यावर ते अवलंबून आहे. काही फ्रँचायझी संघाच्या पहिल्या सत्राच्या शिबिराच्या सुमारे एक आठवडा आधी खेळाडूला धनादेश देतात. काहींना स्पर्धेपूर्वी अर्धे पैसे मिळतात आणि बाकीचे स्पर्धेदरम्यान मिळतात. काही संघ 15-65-20 फॉर्म्युला फॉलो करतात. म्हणजे स्पर्धा सुरू होण्यापूर्वी १५ टक्के रक्कम, स्पर्धेदरम्यान ६५ टक्के, उर्वरित २० टक्के रक्कम स्पर्धा संपल्यानंतर निर्धारित वेळेत दिली जाते.

Back to top button