कोहलीसारखे रोहितही सोडू शकतो कर्णधारपद

कोहलीसारखे रोहितही सोडू शकतो कर्णधारपद

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

आयपीएल 2022 मध्ये मुंबई इंडियन्सचे आतापर्यंतची कामगिरी निराशाजनकच झाली आहे. या बलाढ्य संघाने सुरुवातीच्या चारही सामन्यांत पराभव पत्करला आहे. यामुळे मुंबईचा संघ गुणतक्त्यात तळात आहे. यामुळे पाच वेळा आयपीएलचे जेतेपद पटकावणार्‍या मुंबईच्या प्ले ऑफमध्ये प्रवेश करण्याच्या प्रयत्नांना मोठा धक्का बसला आहे. कर्णधार व हिटमॅन रोहित शर्माही अपेक्षेप्रमाणे कामगिरी करण्यात अपयशी ठरला आहे. त्याने चार सामन्यांत 20 च्या सरासरीने केवळ 80 धावा जमविल्या आहेत. यामध्ये त्याच्या एकाही अर्धशतकाचा समावेश नाही.

दरम्यान, क्रिकइम्फोशी बोलताना भारताचा माजी खेळाडू संजय मांजरेकरने रोहितच्या कर्णधारपदाबद्दल मोठे भाष्य केले. मांजरेकरने सांगितले की, माझ्या मते, रोहितही विराट कोहलीप्रमाणे कर्णधारपद सोडून केवळ फलंदाजीवर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करेल. तसेच कायरान पोलार्ड हा आंतरराष्ट्रीय पातळीवर चांगल्या पद्धतीने कर्णधारपद सांभाळतो. यामुळे त्याला ही जबाबदारी दिली जाऊ शकते. दरम्यान, 2013 मध्ये रोहितची मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली होती. त्याचवर्षी त्याने मुंबईला जेतेपद जिंकून दिले होते.

दबावाचा फलंदाजीवर परिणाम

लिलावानंतर मुंबई इंडियन्सच्या संघाबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत होते. माझ्या मते, मुंबई इंडियन्सचा संघ आता प्ले ऑफमध्ये पोहोचण्याची शक्यता कमी आहे. रोहित ज्यावेळी टीम इंडियाकडून फलंदाजी करतो, त्यावेळी त्याची बॅट तळपत असते. मात्र, आयपीएलमध्ये मुख्य भूमिका पार पाडत असताना त्याच्यावर दबाव येत असतो. आयपीएलच्या गेल्या तीन-चार हंगामात हेच चित्र दिसत आहे, असेही संजय मांजरेकर यांनी सांगितले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news