मन कस्तुरी रे : तेजस्वी प्रकाश ‘या’ मराठी अभिनेत्यासोबत झळकणार | पुढारी

मन कस्तुरी रे : तेजस्वी प्रकाश 'या' मराठी अभिनेत्यासोबत झळकणार

पुढारी ऑनलाईन डेस्क

हिंदी मालिकेतील लोकप्रिय चेहरा आणि बिग बॉस-१५ फेम तेजस्वी प्रकाश मराठी चित्रपटातून पदार्पणासाठी सज्ज झाली आहे. तिच्यासोबत मराठी सिनेमातील चॉकलेट बॉय अभिनय बेर्डे झळकणार आहे. अभिनय आणि तेजस्वी प्रकाश ही फ्रेश जोडी असलेल्या ‘मन कस्तुरी रे’ या चित्रपटाचे पोस्टर गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर सोशल मीडियावर रिलीज करण्यात आले आहे.

या पोस्टरमध्ये समुद्र किनारी स्कूटवरवर अभिनय आणि तेजस्वी यांचा रोमँटिक अंदाज दिसून येत आहे. त्यांचा हा लूक सोशल मीडियावर लक्ष वेधून घेत आहे. जसा पोस्टरचा लूक फ्रेश आहे, तसाच फ्रेश लूक संपूर्ण चित्रपटात पाहायला मिळणार आहे. हा एक युथफुल सिनेमा आहे, असं दिग्दर्शक संकेत माने यांनी सांगितले आहे. संकेत माने याचा दिग्दर्शक म्हणून पहिला सिनेमा आहे.

ती सध्या काय करते, अशी ही आशिकी आणि रम्पाटनंतर अभिनयाच्या नव्या रोमँटिक सिनेमाची त्याच्या फॅन्सना उत्सुकता आहे. तर, मुळची मराठी असलेल्या तेजस्वीनीने गेली अनेक वर्षे संस्कार -धरोहर अपनों की, स्वरांगिनी जोडे रिश्तों के सूर, पहरेदार पिया की, सिलसिला बदलते रिश्तों का आणि त्यानंतर बिग बॉस-१५ मधून प्रेक्षकांची पसंती मिळवली आहे. आता तेजस्वी मराठी सिनेमात दिसून येणार आहे.

लवकरच या सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख समोर येईल. या सिनेमाचे संगीतही खास असेल, टाईम्स म्युझिक या सिनेमाशी जोडले गेले आहेत.

इमेन्स डायमेन्शन एंटरटेन्मेंट अॅन्ड आर्टस, वेंकट आर. अट्टीली आणि मृत्यूंजय किचंबरे यांनी या सिनेमाची निर्मिती केली आहे. प्रेमाची एक अनोखी कहाणी मांडणाऱ्या या सिनेमाचे चित्रीकरण संपूर्णपणे मुंबईत झाले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Tejasswi Prakash (@tejasswiprakash)

 

View this post on Instagram

 

A post shared by Tejasswi Prakash (@tejasswiprakash)

 

View this post on Instagram

 

A post shared by Abhinay L Berde (@abhinay3)

 

View this post on Instagram

 

A post shared by Abhinay L Berde (@abhinay3)

Back to top button