IPL : पंजाब किंग्ज समोर आरसीबीचे २०६ धावांचे आव्हान | पुढारी

IPL : पंजाब किंग्ज समोर आरसीबीचे २०६ धावांचे आव्हान

पुढारी ऑनलाईन डेस्क :  

फाफ डू प्लेसिसने ५७ चेंडूंमध्ये केलेल्या दमदार अर्धशतकी खेळीच्या जोरावर आरसीबीने पंजाब किंग्ज समोर २०६ धावांचे आव्हान ठेवले आहे. आरसीबीकडून विराट कोहलीने ४१ धावांची तर दिनेश कार्तिकने ३२ धावांची खेळी केली.

आरसीबीला दुसरा धक्का

फाफ डूप्लेसिस ५७ चेंडूमध्ये ८८ धावांची दमदार खेळी करत माघारी परतला आहे. विराट आणि डू प्लेसिसने दुसऱ्या विकेट साठी शतकी भागिदारी केली आहे. कोहली आणि दिनेश कार्थिक क्रिजवर टिकून आहेत.

फाफ डू प्लेसिसने झळकवलेल्या दमदार अर्धशतकाच्या जोरावर आरसीबीचा स्कोर शंभरी पार झाला आहे. फाफ डू प्लेसिस ४४ चेंडूंमध्ये ६४ खेळी करत क्रिजवर टिकून आहे. विराट कोहलीनेही १८ चेंडूंमध्ये ३० धावांची खेळी केली आहे. (IPL)

रॉयल चॅलेंजर्स बँगलोरचा स्कोर १४ षटकांनंतर १३६ इतका आहे. आरसीबीचा कर्णधार म्हणून आज फाफ डू प्लेसिस मैदानात उतरला आहे. विराट कोहली आणि फाफ डू प्लेसिसने १०० धावांची भागिदारी केली आहे. (IPL)

हेही वाचलतं का?

Back to top button