रोहित शर्मा याने पॉली उम्रिगर नंतर कर्णधार म्हणून केली ऐतिहासिक कामगिरी | पुढारी

रोहित शर्मा याने पॉली उम्रिगर नंतर कर्णधार म्हणून केली ऐतिहासिक कामगिरी

पुढारी ऑनलाईन : रोहित शर्माच्या कसोटी कर्णधारपदाची सुरुवात भारताने मोहालीमध्ये श्रीलंकेचा एक डाव आणि २२२ धावांनी पराभव करून दोन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. अशाप्रकारे रोहित शर्मा डिसेंबर १९५५ मध्ये पॉली उमरीगर नंतर कसोटी कर्णधार म्हणून पहिल्या सामन्यात भारताला डावात विजय मिळवून देणारा दुसरा खेळाडू ठरला आहे. रवींद्र जडेजा आणि रविचंद्रन अश्विन यांची अष्टपैलू कामगिरी हे या कसोटीचे मुख्य आकर्षण असल्याने संपूर्ण सामन्यात भारताचे वर्चस्व होते.

भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातील पहिलाच कसोटी सामना तब्बल १ डाव आणि २२२ धावांच्या मोठ्या फरकाने जिंकला. या विजयाने पॉली उम्रिगर यांच्यानंतर कर्णधार म्हणून पहिल्याच कसोटीत डावाच्या फरकाने सामना जिंकणारा केवळ दुसराच संघनायक बनला आहे. उम्रिगर यांनी १९५५-५६ मध्ये मुंबई येथे न्यूझीलंडविरुद्ध कसोटी कर्णधार म्हणून पदार्पण केले होते. त्यांच्या नेतृत्त्वाखाली भारतीय संघाने १ डाव आणि २७ धावांनी हा सामना जिंकला होता.

याखेरीज कर्णधार म्हणून पहिल्याच कसोटी सामन्यात सर्वात मोठा विजय मिळवण्याच्या विक्रमातही रोहित दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. या विक्रमात त्याने मॉन्टी बाउडेन आणि लॉर्ड हॉक यांना मागे टाकले आहे. बाउडेन यांनी १८८९ मध्ये १ डाव २०२ धावांनी त्यांचा पदार्पणाचा कसोटी सामना जिंकला होता. तर माजी कर्णधार हॉक यांनी १९८६ मध्ये एक डाव १९७ धावांनी सामना जिंकत या विक्रमात आपले नाव नोंदवले होते. तसेच रिडले जेकब एक डाव ३०१ धावांच्या मोठ्या विजयासह या विक्रमात अव्वलस्थानी आहे.

भारत विरुद्ध श्रीलंका यांच्या मालिकेतील पहिल्या आणि रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील पहिल्याच कसोटी सामन्यात भारताने श्रीलंकेवर एक डाव आणि २२२ धावांनी प्रचंड मोठा विजय मिळवला. मोहालीच्या पीसीए स्टेडियमवर झालेला हा सामना सबकुछ रवींद्र जडेजा ठरला. जडेजाने नाबाद १७५ धावा केल्या, शिवाय त्याने गोलंदाजीत कमाल दाखवताना पहिल्या डावात ५ (४१ धावा) आणि दुसर्‍या डावात ४ (४६ धावा) अशा ९ विकेटस् घेतल्या.

रोहित शर्माच्या नावावरील विक्रम

* १०० वी कसोटी जिंकणारा विराट कोहली हा भारताचा पाचवा खेळाडू ठरला. याआधी अनिल कुंबळे, व्ही. व्ही. एस. लक्ष्मण, हरभजन सिंग व इशांत शर्मा यांनी त्यांच्या १०० व्या कसोटीत विजय मिळवला होता.

* रोहित शर्माने भारताचा कर्णधार म्हणून ४२ सामन्यांत ३६ विजय मिळवले आहेत, तर ६ सामने गमावले आहेत. हा त्याचा सलग १३ वा विजय ठरला.

* २१ व्या दशकात कसोटी संघाचा कर्णधार म्हणून पदार्पणाचा सामना जिंकणारा रोहित हा पाचवा कर्णधार ठरला. याआधी रिडीली जेकब्स, ग्रॅमी स्मिथ, केन विलियम्सन, क्विंटन डी कॉक यांनी हा पराक्रम केला आहे.

* पॉली उम्रीगर यांच्यानंतर कर्णधार म्हणून पहिल्याच कसोटीत डावाने विजय मिळवणारा रोहित शर्मा हा दुसरा भारतीय कर्णधार ठरला. पॉली उम्रीगर यांनी १९५५/५६ मध्ये न्यूझीलंडविरुद्ध मुंबई कसोटीत एक डाव व २७ धावांनी विजय मिळवला होता.

 

 

Back to top button