FIFA World Cup 2026: फिफा वर्ल्डकपमध्येही 'पाकिस्तानी' रणनिती... बहिष्कार, धमकी अन् सामना हलवण्याची मागणी

FIFA World Cup 2026
FIFA World Cup 2026pudhari
Published on
Updated on

FIFA World Cup 2026: पाकिस्तानने भारतात झालेल्या टी २० वर्ल्डकपमध्ये अनेक नाटकं केली होती. त्यांनी सुरक्षेच्या कारणास्तव त्यांचे सामने हे भारत सोडून इतर ठिकाणी हलवण्याची मागणी केली होती. टी २० वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानचे सर्व सामने श्रीलंकेत खेळवण्यात आले होते.

आता याच धरतीवर फिफा वर्ल्डकपमध्ये देखील मागणी होत आहे. सध्या अमेरिका-इस्त्रायल आणि इराण यांच्यात युद्ध सुरू आहे. त्यातच ११ जून पासून फिफा वर्ल्डकप होत आहे. यंदाचा फिफा वर्ल्डकपचे सामने हे युएसएसह मॅक्सिको आणि कॅनडा या देशांमध्ये होणार आहेत.

सामने अजून लांब असले तरी इराणने आताच सुरक्षेच्या कारणास्तव आमचे सामने अमेरिकेतून हलवण्यात यावे अशी मागणी केली आहे.

FIFA World Cup 2026
T20 World Cup 2026: भारताकडून हरलात ५० लाख रूपये द्या... पीसीबी पाकिस्तान संघाकडून वसूल करणार दंड

मॅक्सिकोनं दिली ऑफर

भारतात झालेल्या टी २० वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानप्रमाणे बांगलादेशने देखील अशीच मागणी केली होती. मात्र आयसीसीने ऐनवेळी वेळापत्रकात बदल करण्यास नकार देत बांगलादेशलाच वर्ल्डकपमधून बाहेरचा रस्ता दाखवला. आता इराणने फुटबॉलचा कुंभ मेळा समजल्या जाणाऱ्या फिफा वर्ल्डकपचे त्यांचे सामने मॅक्सिकोमध्ये शिफ्ट करण्यात यावे अशी मागणी केली आहे. मॅक्सिकोने देखील जर गरज पडली तर इराणचे सर्व सामने आमच्या देशात खेळवले जावेत अशी ऑफर दिली आहे.

मॅक्सिकोचे राष्ट्रपती क्लाऊडिया यांनी जर फुटबॉलची सर्वोच्च संघटना फिफाची इच्छा असेल तर मॅक्सिको इराणचे सर्व सामने होस्ट करण्यास तयार आहे. यासाठी आमच्या देशाला काही अडचण नाही. इराण फुटबॉल फेडरेशनने आधीही फिफाला त्यांचे सामने अमेरिकेबाहेर दुसऱ्या देशात शिफ्ट करण्यात यावेत अशी विनंती केली आहे.

FIFA World Cup 2026
India Vs Pakistan Digital Reach: छप्पर फाड के... ICC T20 World Cup मध्ये कधी झालं नाही ते यंदाच्या भारत-पाक सामन्यात घडलं

खेळाडूंना सुरक्षेबाबत चिंता

सध्याच्या घडीला अमेरिका आणि इराण यांच्यात लष्करी संघर्ष सुरू आहे. त्यानंतर इराणच्या संघातील खेळाडूंना अमेरिकेतील त्यांच्या सुरक्षेबाबत चिंता आहे.

यंदाचा फिफा वर्ल्डकप हा पहिल्यांदाच तीन देशात आयोजित केला जाणार आहे. ही स्पर्धा अमेरिका, मॅक्सिको आणि कॅनडामध्ये आयोजित होणार आहे. इराण आपले ग्रुप स्टेजमधील सामने अमेरिकेतील अनेक शहरात खेळणार आहे.

इराण संघासाठी फक्त सुरक्षा हा मुद्दा नसून इराणला वीजा नियम, प्रवासावरील बंधने आणि राजकीय वातावरण याची देखील चिंता आहे. अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की या कारणांमुळे संघाच्या तयारीवर आणि स्पर्धेत सहभागी होण्यावर प्रभाव पडत आहे.

FIFA World Cup 2026
FIFA World Cup 2026 : फुटबॉल वर्ल्डकपमधील सर्व 104 सामने होणार हाऊसफुल्ल

सामने हलवणे सोपे नाही

सध्याच्या घडीला स्पर्धेचं शेड्युल, स्टेडियम आणि तिकीट सर्व तयार आहे. त्यामुळं अशा परिस्थीती दुसऱ्या देशात सामने हलवणे सोपे असणार नाही. सध्याच्या घडीला फिफाने याबाबत कोणतेही वक्तव्य केलेले नाही.

FIFA World Cup 2026
Donald Trump Iran attack | 'आम्हाला पेट्रोल-डिझेलची गरज नाही' : ट्रम्प यांचे युद्धाच्या १८ व्या दिवशी मोठे विधान

इराणचा बहिष्कार?

जर या समस्यांचे समाधान झाले नाही तर इराण स्पर्धेवर बहिष्कार देखील घालू शकतो. आंतरराष्ट्रीय राजकारणाचा खेळावर देखील प्रभाव पडू शकतो. सध्याच्या घडीला मॅक्सिकोने आपले दरवाजे उघडले आहेत. मात्र शेवटी निर्णय हा फिफालाच घ्यायचा आहे. टी २० वर्ल्डकपमध्ये देखील बांगलादेशला अखेरच्या क्षणी बाहेर पडावं लागलं होतं. त्यांच्या जागी स्कॉटलँडचा समावेश करण्यात आला होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news