IPL 2026 पूर्वीच RCB साठी वाईट बातमी! SRH ला देखील मोठा झटका

RCB SRH setback : दोन दिग्गज खेळाडूंमुळे फ्रँचायझींच्या चिंतेत भर पडली आहे.
IPL 2026 पूर्वीच RCB साठी वाईट बातमी! SRH ला देखील मोठा झटका
Published on
Updated on

बेंगळुरू : आयपीएल २०२६ चा बिगुल वाजला असून २८ मार्च रोजी या हंगामातील पहिला थरार रंगणार आहे. उद्घाटनाच्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB) आणि सनरायझर्स हैदराबाद (SRH) हे दोन संघ आमनेसामने असतील. मात्र, या हाय-व्होल्टेज लढतीपूर्वीच दोन्ही संघांच्या अडचणीत वाढ झाली आहे. स्टार वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स आणि जोश हेझलवूड हे सुरुवातीच्या काही सामन्यांना मुकण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) जाहीर केल्यानुसार, २८ मार्चपासून आयपीएलच्या आगामी हंगामाला सुरुवात होत आहे. सर्व संघांनी आपापल्या सराव शिबिरांना सुरुवात केली असतानाच, काही प्रमुख विदेशी खेळाडूंच्या उपलब्धतेबाबत साशंकता निर्माण झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दोन दिग्गज खेळाडू संघात उशिराने सामील होणार असल्याने संबंधित फ्रँचायझींच्या चिंतेत भर पडली आहे.

IPL 2026 पूर्वीच RCB साठी वाईट बातमी! SRH ला देखील मोठा झटका
IPL History and Records : सर्वाधिक 'मेडन ओवर्स' टाकणारे टॉप-५ गोलंदाज; बुमराह अजून खूप मागे

पॅट कमिन्स आणि जोश हेझलवूडची अनुपस्थिती

सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार आणि हुकमी एक्का असलेला पॅट कमिन्स सुरुवातीच्या सामन्यांमध्ये खेळू शकणार नाही, असे समजते. त्याच्या आगमनाला विलंब होण्याची शक्यता असल्याने हैदराबादच्या गोटात अस्वस्थता आहे. दुसरीकडे, आरसीबीचा मुख्य वेगवान गोलंदाज जोश हेझलवूड हा देखील सुरुवातीच्या सत्रात उपलब्ध नसेल, अशी माहिती समोर येत आहे.

हैदराबादला शोधावा लागणार नवा कर्णधार

पॅट कमिन्सच्या अनुपस्थितीचा सर्वाधिक फटका सनरायझर्स हैदराबादला बसण्याची शक्यता आहे. कमिन्स केवळ प्रमुख गोलंदाजच नव्हे, तर संघाचा कर्णधारही आहे. त्याच्या अनुपस्थितीत संघाचे नेतृत्व कोणाकडे सोपवायचे, हा मोठा प्रश्न व्यवस्थापनासमोर आहे. अद्याप अधिकृत घोषणा झालेली नसली तरी, यष्टिरक्षक फलंदाज ईशान किशन याच्याकडे कर्णधारपदाची धुरा सोपवली जाऊ शकते. ईशानकडे आंतरराष्ट्रीय स्तरावर नेतृत्वाचा अनुभव नसला, तरी देशांतर्गत क्रिकेटमधील त्याच्या अनुभवामुळे त्याला प्रबळ दावेदार मानले जात आहे.

IPL 2026 पूर्वीच RCB साठी वाईट बातमी! SRH ला देखील मोठा झटका
IPL History and Records : सर्वाधिक विजय मिळवणारे टॉप-५ संघ; पाहा कोण आहे 'नंबर १'

हेझलवूडविना आरसीबीची धार होणार कमी

रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूसाठी देखील जोश हेझलवूडची अनुपस्थिती चिंतेची बाब आहे. हेझलवूड हा आपल्या अचूक टप्प्यावरील गोलंदाजीने सामन्याचे चित्र पालटण्यात माहीर आहे. त्याच्या जागी संघात कोणाला संधी मिळते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

आता हे दोन्ही संघ आपल्या या प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीत कोणती रणनीती आखतात, याकडे क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news